लवंग ता.माळशिरस येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये गुरू पौर्णिमा केली साजरी

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
पौराणिक व ऐतिहासिक काळापासून चालत आलेली गुरू व शिष्याचे महती सांगणारा सण म्हणजे गुरू पौर्णिमा.या दिवशी शिष्य गुरूची चरणाची पूजा करून त्यांचा योग्य सन्मान करतात.वर्षभर गुरू शिष्यांना ज्ञान देत असतं.त्यांच्या ॠणातून उताराई करण्याचा आजचा दिवस असतो.

आज सकाळी मुले शाळेत आल्या नंतर त्यांनी विद्येची आराध्य दैवत सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले त्या नंतर या मुलांना ज्ञानाचे कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिक व शिक्षीका .नूरजहाॅं फक्रुउद्दीन शेख यांना पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सर्व मुलांनी नूरजहाँ शेख मॅडम व गुलशन नशीब शेख मॅडम यां गुरूंचे आशीर्वाद घेतला.यावेळी मुलांनी गुरू ब्रम्हा…गुरू विष्णु…गुरू देवो महेश्वरा…गुरू साक्षात परब्रह्म…तस्मै श्री, गुरूदेव नमः हे श्लोक गाऊन आज मुलांनी शाळेमध्ये एक गुरू शिष्यांचे नात्याचे अनोखे दर्शन घडविले आहे.



