बहुजन ब्रिगेड महासंघाच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी जगन्नाथ पवार.

प्रतिनिधी… रियाज मुलाणी मो.9921500780
अकलूज येथे बहुजन ब्रिगेड महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये बहुजन ब्रिगेड महासंघाच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी जगन्नाथ महादेव पवार यांची नियुक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष गणेश साठे, प्रदेशाध्यक्ष रियाज मुलाणी, जिल्हा उपाध्यक्ष नागेश ठोंबरे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली जगन्नाथ पवार हे महासंघाच्या माळशिरस तालुका संपर्कप्रमुख या पदावर यापूर्वी कार्यरत होते

त्यांनी समाधानकारक काम केल्याने वरिष्ठांनी त्यांची वर्णी जिल्ह्याच्या संघटक पदावर करावी अशी मागणी होताच संघटनेच्या संस्थापक मंडळाने त्यास तात्काळ मंजुरी देत सोलापूर जिल्हा संघटक पदावर निवड करण्यात आली याप्रसंगी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी मोहिते, यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी उपाध्यक्ष गणेश साठे, प्रदेशाध्यक्ष रियाज मुलाणी, जिल्हा उपाध्यक्ष नागेश ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



