महाराष्ट्र

माळशिरस विधानसभा निवडणुकीला आता बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व दिले पाहिजे -किरण धाईंजे

बी टी शिवशरण

माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने गेल्या तिन्ही निवडणुकीत चर्मकार समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे आता येणाऱ्या विधानसभेला बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया आठवले गटाचे सोलापूर जिल्हा युवक आघाडीचे कार्याध्यक्ष किरण धाईजे यांनी केली आहे ही मागणी करताना त्यांनी म्हटले आहे की माळशिरस तालुक्यातील बौद्ध समाजाने तालुक्यातील सामाजिक राजकीय घडामोडीमध्ये मोठे योगदान दिले आहे तालुक्यातील वाटचालीत आंबेडकरी चळवळ अग्रेसीव्ह राहिली आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व माळशिरस तालुक्याचे वजनदार नेतृत्व सन्माननीय विजयसिंह मोहितेपाटील यांच्याशी सामाजिक राजकीय मित्रात्वाचे ऋणानुबंध राहिलेले आहेत अनेकदा राज्यात निवडणुकामध्ये जरी वेगळ्या पक्ष्याबरोबर युती असायची तेव्हा रामदास आठवले विजयसिंह मोहिते पाटील यांनाच सहकार्य करा म्हणून आदेश कार्यकर्त्यांना द्यायचे येथील जरी काही संघटना वेगळे राजकीय गट तट इतरवेळी दुसऱ्या पद्धतीने काम करत असले तरी विधानसभा लोकसभा निवडणुकीला मोहितेपाटील यांनाच मदत सहकार्य करत आला आहे ही परंपरा वाटचाल सहकार महर्षी शंकरराव मोहितेपाटील यांच्यापासून चालत आली आहे
माळशिरस तालुक्यात बौद्धसमाजाची मोठी लोकसंख्या आहे हा समाज दलितांच्या बहुजणांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनात अग्रभागी असतो देशात किंवा राज्यात कुठे सामाजिक अन्याय आत्याच्याराची घटना झाली की बौद्ध समाज कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतात वेळप्रसंगी आंदोलनात अनेक केसेस अंगावर घेऊन न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करतात अनेक घटना प्रसंग अनुभव आहेत या समाजाला विधानसभा निवडणुकीला प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे ही आग्रही भूमिका व मागणी करताना किरण धाईजे यांनी माळशिरस तालुक्यातील सर्व युवा कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद गट तट विसरून एकत्रित येण्याचेआवाहन केले आतापासूनच युवक आघाडी मजबूत करुन रिपब्लिकन पक्ष्याचे महाराष्ट्र प्रदेश्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यात प्रत्येक शहरात गावात युवक आघाडी शाखा काढण्याचा मनोदय व्यक्त केला त्यांच्या मागणीला माळशिरस तालुक्यातील युवकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे माळशिरस तालुक्यात रिपब्लिकन पक्ष आठवले गट व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना मानणारा मोठा युवक समाज आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा माळशिरस तालुका बालेकिल्ला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button