महाराष्ट्र

एकनाथ शिंदे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे.-राहुल बिडवे

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची वीज तोडणी शिंदे सरकारने चालू केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे सध्या शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये उभा आहे जो ऊस कारखान्याला गेला त्याचे बिल अद्याप आलेले नाही शेतकऱ्यांची ऊस केळी द्राक्ष पपई ऊस गहू मका व इतर पिके पाणी असताना दिवसाढवळ्या जळून जाणार आहेत आणि याला शिंदे सरकार जबाबदार राहणार आहे अशी सडकून टिका रयत क्रांती संघटनेचे राहुल बिडवे यांनी अकलुज येथे पञकाराशी बोलताना केले.
उन्हाळ्याच्या तोंडावर महावितरण कंपनीने विजतोडणी मोहीम हाती घेतली असून विज बील भरा अन्यथा विज तोडण्यात येई असा तुघलकी फर्मान काढल आहे. माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वीज वितरण कंपनीने अचानक वीज बील भरण्याचे फर्मान काढले असून फक्त दोनच तास शेतीपंपाची वीज सोडण्यास सुरूवात केली आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर महावितरण कंपनीने अचानक वीज बंदचा निर्णय घेतल्याने हातातोंडाशी आलेली पिके जुळून जाणार आहेत मात्र मागील काळात शेतकऱ्यांचा कळवळा असणारे राजकर्ते मात्र मुग गिळून गप्प आहेत त्यामुळे हाताची घडी तोंडावर बोट अशी त्यांची अवस्था झालेली दिसून येत आहे.

 ऊस, केळी, कलिंगड, द्राक्षे, मका आदी पिकांना सध्या पाण्याची गरज असून ऐन भरात असताना पाणी न मिळाल्यास या पिकांचे मोठे नुकसान होण्याची होणार आहे असे राहुल बिडवे यांनी सांगितले . मात्र झोपेचे सोंग व शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्या राजकर्त्यांना जाग कधी येणार? असाही प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार व राष्ट्रवादीचे एक आमदार असताना वीज तोडणी बाबत सध्या ते मूग गिळुण गप्प आहेत वीज तोडणी जर नाही थांबली तर या लोकप्रतिनिधींना भविष्यात जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
 राहुल बिडवे 
रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button