अकलूज नगरपरिषद कडे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाची निवेदनाद्वारे मागणी.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज शहरातील बरेच लोक बेघर आसलेल्याने या लोकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस भर बाहेर जातात पण संध्याकाळ झाली की डोळ्यासमोर प्रश्न येतो तो झोपायचे कुठे या बेघर निराधार व्यक्तीमध्ये काही महिला व पुरुषाचा ही समावेश आहे
समाजामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असताना देखील या लोकांना वर्षानुवर्षे उन वारा पाऊस यांचा सामान करत उघड्यावरती झोपाव लागत आहे तरी आपण लवकरात लवकर सध्या बंद अवस्थेत असलेली धर्मशाळा तात्पुरत्या स्वरूपात चालू करावी व शासन दरबारी या बेघर निराधार लोकांनचे प्रश्न मांडून एक नवीन बेघर लोकांना निराधार साठी राहण्याची उत्तम सोय होईल अशी नविन धर्मशाळा चालू करावी अशी मागणी अकलूज नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री दयानंद गोरे यांच्याकडे केली आहे

यावेळी उपस्थित पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने संग्राम नगर विभाग शहर अध्यक्ष रोहित टेके बबन शिरढोणे तालुका महिला अध्यक्ष सौ शोभा ताई दळवी तालुका महिला उपाध्यक्ष सौ अश्विनी ताई पांढरे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ शुभांगी ताई मोरे तालुका महिला सरचिटणीस सौ वंदना ताई तिकोटे उपस्थित होते



