स्वतः ची समजूत स्वतः काढण्या शिवाय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पर्यायच नाही…

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499
एक गोष्ट आवर्जुन सांगावीशी वाटते की,रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पहिले उमेदवार असतील की ज्यांनी आपला स्वतः चा पराभव स्वतः केला कारण असं हि आता ते पाच आमदारांच्या बंगल्यावर चकरा मारत आहेतच की मग “शिवरत्न” वर एखादी चक्कर मारली असती तर काय फरक पडला असता…?
रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच भ्रमात राहिले की भाजपा ने आपल्याला उमेदवारी जाहीर केल्यावर मोहिते आणि कंपनी आपलाच प्रचार करतील पण असे झाले नाहीं कारण निंबाळकरां पेक्षा मोहितेंना राजकीय अनुभव हा जास्त असून निंबाळकर हे फडणवीस,अजित पवार,दोन्हीं आमदार शिंदे बंधु आणि झाडी डोंगर वाले शहाजी बापू यांच्या भरवशावर गेले आणि येथेच फसले…
ह्या दरम्यान ची एक गोष्ट म्हणजे येथून तेथून ची सर्व जनता हि फडणविस,अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वर नाराज झालेली होती आणि मोहितेंनी हेच पक्के हेरून धनगर समाजाचे पॉवर फूल नेते उत्तमराव जानकर यांच्याशी जवळीकता निर्माण केली…
परवा वेळापूर येथील सभेत मोहिते आणि जानकर या दोघांनी हि कबुल केलेच होते की,आम्हीं गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होतो,तर यातुन स्पष्ट असे होते की मोहिते पाटील यांनी दाखवून दिले की आपण पट्टीचे राजकारणी आहोत आणि जानकर हे देखील काल परवा पर्यंत निंबाळकर यांना विमानाची ट्रिप घडवून मुर्खातच काढत होते…
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या अगोदर देखील अनेक इलेक्ट्रॉनिक मिडिया ला मुलाखती दिल्या आहेत आणि येथुन पुढील काळात देखील ते काही मुलाकात देतील हि परंतु त्यांनी आपण दिलेल्या मुलाखती नंतर लोकांच्या प्रतिक्रिया हि बघाव्यात हि विनंती…असो…
इकडे भाजप ने निंबाळकर यांना जवळ जवळ एक महिना अगोदर उमेदवारी जाहीर करून देखील ते फलटण येथील आपल्या भाऊ भावकी च्या विश्वासास पात्र ठरले नाहीत आणि तिकडे रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब,रघुनाथ राजे नाईक निंबाळकर,करमाळा चे नारायण आबा पाटील,मा सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख,खटाव चे रणजित देशमुख,लोकनेते उत्तमराव जानकर,सांगोल्याचे देशमुख बंधु,म्हसवड चे अभय सिंह जगताप,टेंभुर्णी चे संजय (बाबा) कोकाटे,मोडनिंब चे शिवाजी कांबळे,विट्ठल चे अभिजित पाटील यांच्या सह भाजपा आणि फडणविस,अजित पवार,एकनाथ शिंदे यांच्या वर नाराज झालेली जनता असा सगळा गोतावळा एक कऱण्यात मोहिते पाटील सक्सेस झाले हे मात्र तितकेच खरे…
हा राजकीय गोतावळा एक करत असताना मोहिते पाटील यांनी जनभावनेचा आदर हि तितक्याच विनम्रतेने केला हे विशेष…
रणजितसिंह नाईक निंबाळकर असे बोलताना दिसतात की मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्या मुळे धनगर समाजावर अन्याय झाला मग आपण हि या दोघा बरोबर होताच की मग त्यावेळी का नाही अन्याय दुर केला…? हा प्रश्न निर्माण होतो… तरी हि ठीक आहे…असो…
ज्या पाच आमदारांच्या रिपोर्ट वर भाजपा ने निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली ते पाच आमदार गेली एक महिना कुठे होते हा देखील संशोधनाचा विषय आहे…
आता विषय राहतो तो लोकसभा निवडणुकीत कुठला समाज कुठल्या उमेदवारा सोबत असेल याचा तर याचे विश्लेषण करणे निंबाळकर यांनाच महागात पडेल असे सध्या तरी वाटत आहे कारण मराठा समाज आरक्षण आणि धनगर समाज आरक्षण हे दोन्हीं विषय भाजपा ला घातकच ठरतील आणि माढा लोकसभा मतदार संघातील प्रत्येक समाज हा शरद पवार तसेच विजयसिंह मोहिते पाटील,रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सह जाऊन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या साठी “तुतारी” नक्कीच वाजवेल हे मात्र निश्चित खरे…



