महाराष्ट्र

सोलापूर ची जनता राम सातपुते यांचं पॅक अप लवकरच करणार…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499

सोलापूर लोकसभेचे भाजपा चे आयात उपरे उमेदवार राम सातपुते हे काल एका पत्रकार परिषदेत बोलत असताना मोहोळ तालुक्यातील मराठा समाज बांधवांशी आरक्षणा बाबत जी चर्चा झाली त्यावर उसने स्मित हास्य आणत बोलत होते आणी हे बोलत असताना त्यांच्या बोलण्यात एवढा कॉन्फिडन्स हि नव्हता हे हि तितकेच खरे पण प्रश्न असा पडतो की ज्या वेळेस आमचे मराठा समाज बांधव भर उन्हात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते त्या वेळी आपण कुठे होता…?

आणि बोलता बोलता राम सातपुते यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा संपे पर्यंत फेटा न घालण्याचा निर्णय हि जाहीर करून टाकला,त्यांच्या या वक्तव्यावर हसु देखील आले कारण राम सातपुते हे काही एवढे मोठे नेते नाहीत कि मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ह्यांच्या उपस्थितीत सुटेल,मुळात राम सातपुते यांनी पत्रकारांना घुमजाव करत तो विषय तिथेच टाळत मुस्लिम लव्ह जिहाद वर आणुन सोडला आणि सोलापूर लोकसभा मतदार संघात आपल्या पराभवाचा पाया आणखी मजबुत केला…

ज्या वेळेस ते लव्ह जिहाद वर बोलत होते त्या वेळी त्यांनी सोलापूर येथे काँग्रेस चे सरकार आहे असे हि जाहीर वक्तव्य केले,याचा अर्थ राम सातपुते हे धांदात खोटे बोलत आहेत असे सिद्ध होते आणि आपला पराभव समोर दिसत असल्याने जातीवाचक बोलून काही तरी साध्य होतय का हे हि पाहत आहेत,राम सातपुते यांनी असेच बोलत राहिले तर 4 जुन रोजी ह्यांच्या पदरात काय पडेल हे सांगण्याची गरज नाही असे मला तरी वाटते…

राम सातपुते यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी सोलापूर लोकसभा मतदार संघा करिता भाजपा ला शेवटच्या क्षणा पर्यंत उमेदवार हि न मिळाल्यामुळे आणि आपण फडणवीस यांचे ताटातले असल्यामुळे हि उमेदवारी देण्यात आली आहे…

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना राम सातपुते असे हि म्हणाले की मोदी सोलापूर येथुन निवडणुक लढत आहेत असे समजुन लोकांनी सहकार्य करावे… या वेळी असा प्रश्न पडतो की एक मोदी भारतात कुठे कुठे निवडणूक लढ्वत आहेत आणि मोदींना सोलापूर च्या प्रश्ना बद्दल एवढी आत्मियता होती तर गेली दहा वर्षे ते काय करत होते…? गेले दोन टर्म सोलापूरकरांनी भाजपा चाच उमेदवार निवडून दिला होता ना…?

हे पहा राम सातपुते जी आमच्या सोलापूर लोकसभा मतदार संघातील जनता गेल्या दहा वर्षे विकासापासून दूर आहे तरी तुम्ही असे निरर्थक आणि हास्यास्पद स्टेटमेंट पत्रकारांना देऊन जनतेची दिशाभूल करूच नका कारण जनता आता भाजपा च्या कसल्याच भूलथापांना बळी पडणार नाही…

आमच्या असे ऐकण्यात आले आहे की सोलापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ज्या संख्येने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व जाती धर्माचे लोक शेतकरी,कष्टकरी,कामगार प्रत्येक समाजातले महिला पुरुष मोठ्या प्रमाणात त्यांच्या रॅलीमध्ये सामील होते आणि याच कारणामुळे तुमच्या पाया खालची वाळू सरकली आहे म्हणून तुम्हीं आता या निवडणुकीला हिंदू मुस्लिम असा रंग द्यायचा प्रयत्न करत आहात…

राम सातपुते तुमची उमेदवारी जाहीर झालेपासून तुम्ही फक्त स्क्रिप्ट वाचन करत आहात,तुम्हाला सोलापूर च्या प्रश्नांची काही माहिती नाही,तरी आपण कानामागून येऊन तिखट होण्याचा प्रयत्न करूच नये हि विनंती…

येथे अजुन एक गोष्ट नमुद करणे जरुरीचे आहे की एम आय एम पक्षाने भाजपाला फायदा होऊ नये म्हणून फारुक भाई शाब्दी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आणि पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे,त्यामुळे उगाच उचलली जीभ आणि लावली टाळूला असे करू नये…

राम सातपुते जी तुम्हाला आणि तुमच्या भाजपा ला सोलापूर लोकसभा मतदार संघात च नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच मतदात संघात सहानुभूती मिळणार नाही हे हि ध्यानात असु द्या…

जाता जाता शेवटचे…सोलापूर सभेला सिरीयस घ्या कारण तुम्हाला आमदार सुध्दा भाजपा ने नाही तर विजयसिंह मोहिते पाटील यांनी एका रात्रीत केले होते आणि आता सोलापूर जिल्ह्याच्या भाजपा मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सारखा चेहरा तुम्हाला हुडकून हि सापडणार नाही हे हि ध्यानात असु द्या म्हणजे झालं…

सोलापूर लोकसभा मतदार संघातील जनतेने राम सातपुते यांचं पॅक अप त्याच दिवशी केल होत ज्या दिवशी एका रॅली दरम्यान हे श्रीमान प्रणिती शिंदे यांच्या समोर जोरजोराने घोषणा देत होते हे मात्र पक्क ध्यानात ठेवा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button