महाराष्ट्र

पालघर तालुक्यातील जलसार ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी पालघर ढवळे हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवले आरोग्य शिबिर…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील जलसार ग्रामपंचायतीने 78 व्या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून पालघर येथील डॉ. एम. एल. ढवळे हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया तपासणी आणि कॅन्सर रोग निदान अशा आगळ्यावेगळ्या शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी जलसार ग्रामपंचायत कार्यालयात केले होते .

या शिबिराला ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला.
या शिबिरात एल.एन.टी. प्रोजेक्ट अंतर्गत शस्त्रक्रियेसंदर्भातील रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात मोतीबिंदूचे 16 रुग्ण आणि किडनी स्टोनचे 2 रुग्ण आढळले असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

यासोबतच एस.बी.आय. अंतर्गत कॅन्सर केअर प्रोजेक्टच्या माध्यमातून महिलांच्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा लाभ परिसरातील एकूण १०० जणांनी घेतला.

यावेळी जलसार ग्रामपंचायत महिला सरपंच सौ.साक्षी गजानन गावड, पालघर ढवळे हॉस्पिटल कम्युनिटी हेल्थ विभागाचे मुख्य डॉक्टर जितेश ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर अरुण अनंत घरत, उपसरपंच विंकोश सुरेश म्हात्रे, सदस्य प्रवीण भोईर, नितीन भोईर, शिपाई रवींद्र पाटील, वैजंता पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय बुधाजी घरत, गजानन गावड, ज्ञानेश्वर भोईर, जयदेव भोईर, रामदास घरत आणि पालघर ढवळे हॉस्पिटल मधील कर्मचारी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button