लता निंबाळकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान झाल्याने अकलूज शहर परिट समाज युवक मंडळ यांच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240326-WA0003-780x470.jpg)
प्रतिनिधी…रियाज मुलाणी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मो.99 21 500 780
सौ लता निंबाळकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने अकलूज शहर परिट समाज युवक मंडळ यांच्या वतीने त्यांचा हार, फेटा, शॉल, व श्रीफळ,देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शांतीलाल कारंडे म्हणाले अत्यंत हुशार खेळात गायनात विद्यार्थी शिकवण्यात
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240326-WA0002-1024x528.jpg)
अष्टपैलूत्व असल्यामुळे हा पुरस्कार त्यांना प्रदान झाला आहे गाडगेबाबा नेहमीच सांगत जेवणाचे ताट मोडा पण आपली मुले बाळे शिकवा विद्यार्थी घडवणे सोपी गोष्ट नाही आज लता निंबाळकर यांनी घडवलेली गरिब विद्यार्थी अमेरिकेत जॉब करत आहेत ही मोठी कौतुकास्पद बाब आहे त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार प्रदान झाला आहे याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे माळशिरस तालुका प्रमुख संतोषभैया राऊत, ज्येष्ठ समाज बांधव दत्तात्रय भोसले, अशोक घोडके, बाबासाहेब कारंडे, सुनील वळसे, देविदास कदम, नितीन भोसले, अकलूज शहर उपाध्यक्ष सुरज भोसले, हरी शिंदे, गणेश भोसले, सागर भोसले, गणेश माने, माणिक नवले, विठ्ठल वरपे, अमर भोसले, स्वानंद भागवत, सागर भोसले, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.