विशेष

काळमवाडी (ता. वाळवा) येथील विकास सोसायटीच्या चेअरमन व संचालक भाजप प्रवेश

सांगली जिल्हा प्रतिनिधी :

आनंद सावंत,

टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007932121

सांगली : वाळवा तालुक्यातील काळमवाडी येथील विकास सोसायटीच्या *चेअरमन व संचालक* यांच्यासह समर्थकांनी पेठनाका येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक

*मा.राहुलदादा महाडीक,* सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक *मा.सत्यजीतभाऊ देशमुख* शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख *मा.सम्राटबाबा महाडीक* यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.काळमवाडी येथील विकास सोसायटीचे चेअरमन वसंत सावंत, संचालक बाजीराव सावंत यांच्यासह प्रकाश हिमणे, हणमंत सावंत, सुनिल सावंत, महेश सावंत, संदीप लोहार, संदीप आमणे, अर्जुन लगड, कुमार सावंत, सुनिल भिमराव सावंत, संदीप सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जि. प. चे माजी बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, वाळवा पश्चिम मंडल अध्यक्ष डॉ. सचिन पाटील, शिराळा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलावडे, महाडीक युवा शक्तीचे माजी अध्यक्ष अर्जुन सूर्यवंशी, सचिन सावंत, अजित सावंत, प्रकाश बुचडे, सचिन सूर्यवंशी, सचिन शिंदे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button