संपादकीय

“आबासाहेब आता लय इचार करु नका, औंदा तुतारी हातात घ्या “करमाळा तालुक्यातील एका शेतकऱ्याने नारायणा आबा पाटील यांच्या जवळ केल्या आपल्या भावना व्यक्त

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

“आबासाहेब आता लय इचार करु नका, औंदा तुतारी हातात घ्या ” अशी बोलकी प्रतिक्रिया काल माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या कार्यालयात एका शेतकऱ्याने भेटी दरम्यान दिल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की करमाळा मतदार संघातील शेतकरी आता

थेट माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या कार्यालयात येऊन आपले मत मांडू लागला आहे. अशी मते हजारो शेतकरी गावपारावर आणि वाडी वस्तीवर एकमेकांना भेटल्यावर व्यक्त करत आहेत. लोकसभा निवडणुक लढवा नाही तर विधानसभा निवडणुक लढवा, पण आबासाहेब तुम्ही तुतारी हातात घ्याच हा एकच आशय हजारो शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांमधून दिसुन येत आहे. शरद पवार साहेब यांनी शेतकऱ्यांना खुप काही दिलं आहे आणि संकटकाळी आता मोठ्या साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे ही बळीराजाची भावना माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचे पर्यंत पोहचु लागली आहे. यामुळे जनमाणसाचा कल आता कुठे आहे हे हळुहळू दिसु लागले असून नारायण (आबा) पाटील हेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात मग आता आमचे प्रश्न दिल्लीत जाऊन मांडा नाहीतर मुंबई इथे जाऊन मांडा, परंतु तुम्ही तुतारी हातात घ्याच असे सांगून शेतकरी आपली मनापासून असलेली इच्छा व्यक्त करत आहे. दहिगाव उपसा सिंचन योजना, कुकडीची आवर्तने, सन २०१४ ते २०१९ शेतकऱ्यांचे दारात वीज बिल मागणीसाठी एकदाही न आलेला वायरमन या गोष्टी शेतकरी ध्यानात ठेऊन असून यामुळेच अशा बोलक्या आणि खऱ्या प्रतिक्रिया जेऊर येथील माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यालया पर्यंत पोहचत आहेत. पाटीद गटाकडून सध्या जरी थांबा आणि वाट पहा हे धोरण असले तरी दोन स्वतंत्र टिमा वरीष्ठ हालचालीसाठी कार्यरत असल्याचे तळेकर यांनी सांगितले. लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणुक असेल, या दोन्ही निवडणुका नजरेसमोर ठेऊनच पाटील गटाची रणनीती आखली गेली आहे. आणि त्यावर आता काम सुरु झाले आहे. अजून बरेच पाणी पुलाखालून वाहून जाणार असुन माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचे नाव सुध्दा माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रतिक्षा यादीत आहे. पाटील गटाची मानसिकता बदलाची असून जनतेचा कौल आबासाहेब यांनी तुतारी हाती घ्यावी असाच असला तरी अंतिम निर्णय माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या हाती असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button