शहर

गौरी गणपतीच्या आगमनाची अकलूज बाजार पेठेत लगबग सुरु…

अकलूज प्रतिनिधी अमिर मोहळकर मो.नं.:- 9890299499

आपल्या हिंदु संस्कृती प्रमाणे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण “श्री गणेशा” च्या पुजा अर्चा ने करतो,श्री गणेशा च्या आगमना नंतर “गौरी” च्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे,

टाइम्स 9 मराठी न्यूजने अकलूज बाजार पेठेचा आढावा घेतला असता “गौरी गणपती” च्या आगमनाच्या लगबगीने अकलूज शहराची अख्खी बाजार पेठ ओसंडुन वाहत आहे,त्या मुळे बाजार पेठेतील व्यापाराच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे…

“गौरी गणपतीच्या” सजावटी साठी लागणाऱ्या सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे,फ्लॉवर स्टॉल,फ्रुट स्टॉल,हॉटेल्स,स्वीट होम तसेच विजय चौक परिसर ते जुने एसटी स्टँड पर्यंत आणि सदुभाऊ चौक येथील “शिवशंकर बझार” सह अनेक दुकानदारांचे स्टॉल हे ग्राहकाने फुलू लागली आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button