विशेष

करमाळ्यात शिवसेनेच्या ईव्हीएम हटाओ रॅलीस प्रंचड प्रतीसाद !

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा येथे शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून काढण्यात आलेल्या ईव्हीएम हटाओ रॅलीस प्रचंड प्रतिसाद मिळाला . शेकडोंच्या संख्येत शिवसैनिक युवासैनिक मोटारसायकल वर भगवे झेंडे घोषणांचे फलक घेऊन सहभागी झाले होते.

शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण रॅली तहसिल कचेरीवर पोचल्यावर सभेत रुपांतर झाले यावेळेस संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे, तालुका संघटक प्रवीण कटारीया , सावंत गटाचे सुनिल सावंत, बामसेफ आर आर कदम ,महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळेस बोलताना संपर्क प्रमुख

अनिल कोकीळ यांनी भाजपावर ताशेरे ओढले शिवसेना,राष्ट्रवादी फोडून देखील सत्ता येण्याची चिन्ह दिसत नसल्याने तिन्ही गट अस्वस्थ असून निवडणुकीनंतर यांची किमंत शुन्य होईल असे सांगीतले. उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांनी ईव्हीएम मशीन बरोबरच शेतकऱ्यांच्या मुद्यावर सरकार वर सडकून टिका करताना दोन वर्षांपासून पिक विमा, ठिबक चे अनूदान, रोजगार हमीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणारे सरकार फक्त नावालाच गतीमान असल्याची टिका केली.यावेळेस शहर प्रमुख संजय शिंदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, शहरप्रमुख समीर हलवाई उपतालुकाप्रमुख अभिषेक मोरे, माऊली फरतडे, पांडुरंग ढाणे, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, अमित केंगारमहिला आघाडी केम शहरप्रमुख आशाताई मोरे, युवतीसेना शहर प्रमुख पुजा मोरे, पप्पू निकम, नवनाथ फरतडे आदी विभाग प्रमुख मयुर तावरे आदी उपस्थित होते.पोलीस निरीक्षक विनोद घुगे चोख बंदोबस्त ठेवला होता मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी स्विकारले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button