शहर

श्रम संस्कारामुळे जबाबदारी कळते – सयाजीराजे मोहिते पाटील

अकलूज प्रतिनिधी तात्यासाहेब काटकर

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना अधिक दोन स्तर विभागाच्या माध्यमातून विजयवाडी, विझोरी या गावात श्रमसंस्कार शिबीर गेली सात दिवस उत्साहात पार पडले. सदर शिबीराच्या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक प्रशाला समितीचे सभापती सयाजीराजे मोहिते पाटील होते. हे शिबीर पाहुन मला माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाची आठवण झाली. अशा शिबिरामुळे देशासंबंधी आपुलकी वाढते. स्वच्छतेचे महत्व कळते. भाषण कौशल्य, पुढाकार घेण्याची वृत्ती निर्माण होते. शालेय जीवनात लागलेली शिस्त व काम करण्याची सवय यामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते. राष्ट्रीय सेवा योजना विभाग एक ऊर्जा स्रोत असून शिबिरातील अनुभव विद्यार्थ्यांना भविष्यात कामी येतील. अशी शिबिरे सारखी भरवली जावीत असे प्रतिपादन सभापती सयाजीराजे मोहिते पाटील यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी आपल्या भाषणात श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना शिस्तीचे व सक्षम नेतृत्व गुण आत्मसात करता येतात. तसेच श्रमसंस्कार शिबिरातील कामांचा थोडक्यात आढावा सांगितला. शिबिर काळात स्वंयसेवकांना जीवनाशी निगडित असणाऱ्या विविध विषयांचे मार्गदर्शन, युवकांचे आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, युवकांपुढील आव्हाने संबंधित व्याख्यान अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय वेळापूर येथील डॉ. वरकड यांचे आयोजित केले होते.

प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी बलभिम काकुळे यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व युवकांना श्रमाची लाज वाटू नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे युवकांचा सर्वांगीण विकास करणे चारित्र्यसंपन्न युवक घडविणे व्यसनापासून दूर ठेवणे माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणे असे आहे. देशातील युवकांची सर्वात मोठी संघटना या माध्यमातून निर्माण झाली आहे. या श्रमसंस्काराच्या निमित्ताने हायस्कूल परिसर, नाथ मंदिर परिसर, पाण्याची टाकी, ग्रामपंचायत परिसर, जिल्हा परिषद शाळा परिसर स्वच्छता करण्यात आले. स्वच्छता फेरी, स्वच्छता व साक्षरता दिंडी, तसेच अंगणवाडी परिसर, पंप हाऊस परिसर, शाळा येथे पिंपळ, वड, चिंच या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या शिबिरातील स्वयंसेवक व शिक्षकांना नाष्टा, मिष्ठान्न भोजन प्रतिष्ठित उद्योगपती संजय अवताडे यांनी दिला. शिक्षकांमधून संजय जाधव, विद्यार्थी साक्षी कचरे, अथर्व जाधव यांनी श्रम संस्कारातील अनुभव व्यक्त केले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिर समारोप प्रसंगी स्थानिक प्रशाला समिती सभापती सयाजीराजे मोहिते पाटील, विद्यालाचे मुख्याध्यापक अमोल फुले, विजयवाडी गावाचे सरपंच उमेश भंडारी, उपसरपंच रवींद्र इंगळे, सदस्य हनुमंत पवार, प्रगतशील बागायतदार सतीश इंगळे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब इंगळे, आप्पा इंगळे, शिवाजी बंडगर, माजी सरपंच दीपक इंगळे, बाळू लोखंडे, आरोग्य सेविका साधना साठे राणी गोडवे, विजयसिंह मोहिते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक मदन माने देशमुख, उपप्राचार्य सुभाष मुडफणे, संजय जाधव, विजयवाडी गावातील ग्रामस्थ, सदाशिवराव माने विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर विशेष श्रमसंस्कार शिबिराचे सूत्रसंचालन अनुराधा निंबाळकर यांनी केले तर आभार तात्यासाहेब काटकर यांनी मांनले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button