संपादकीय

अर्थसंकल्पीय अधिवेशन ही लोकप्रतिनिधींना मिळालेली एक नामी संधी यामध्ये करमाळा मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागले असते मात्र अखेरची संधी वाया गेली,,,,,,,,, पाटील गटाचे राजकीय विश्लेषक सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी

अर्थसंकल्पिय अधिवेशन ही लोकप्रतिनिधींना मिळालेली एक नामी संधी होती यात करमाळा मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लागले असते परंतु अखेरची संधी वाया गेली असल्याचे मत राजकीय विश्लेषक सुनील तळेकर यांनी व्यक्त केले. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. सन 2024 विधानसभा निवडणूकी पूर्वीचा हा बहुतेक शेवटचा अर्थसंकल्प होता. यामुळे यात करमाळा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी अंतिम प्रयत्न होणे गरजेचे होते. करमाळा तालुक्यातील पुनर्वसित गावे 18 नागरी सुविधा साठी प्रस्तावित 110 कोटी पैकी 22 कोटी रुपयांचा निधी हा सन 2015 मध्ये मंजूर झाला. यानंतर आज 2023 अखेर या कामासाठी निधी मिळाला नाही. करमाळा तालुका आणि माढा तालुक्यातील अनेक रस्ते दुरुस्तीसाठी निधीच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ट आहेत. विजेची मागणी व पुरवठा यातील अंतर कमी करण्यासाठी 33/11 के व्ही क्षमतेची उपविज केन्द्र निधी अभावी रखडून पडलेली आहेत. पर्यटन विकास अंतर्गत इतर मतदार संघात धार्मिक आणि पर्यटन याची जोड घालून निधी मंजूर झाला. करमाळा मतदार संघात उजनी बॅकवॉटर परिसरात चिखलठाण, कुगाव, केतुर आदी परिसरासाठी या निधीची मागणी करून एव्हाना मंजुरी मिळायला हवी होती. एम आय डी सी विकासासाठी निधीची गरज होती. याशिवाय या अधिवेशनात दहिगाव उपसा सिंचन योजनेतील वाढीव चाऱ्याचा समावेश होऊन इतर काही गावांचा समावेश करणे, नियोजित रीटेवाडी उपसा सिंचन योजना अंतरिम मंजुरी, कृष्णा मराठवाडा प्रकल्पातून करमाळा तालुक्यातील गावांना उचल पाणी परवाने, सरफडोह गावाचा जमीन नोंद प्रश्न, केम औद्योगिक वसाहत मंजुरी, करमाळा बस आगार तसेच जेऊर आरोग्य केंद्र रिक्त कर्मचारी भरती, नियोजित केळी संशोधन केंद्र (शेलगाव वांगी),  शनिदेव, पोथरे, उत्तरेश्र्वर केम, कोटलिंग चिखलठाण, किर्तेश्वर राजुरी, नागनाथ हिवरे, आदिनाथ संगोबा या तीर्थक्षेत्रांच्या दर्जा बदलांचा निर्णय, ग्रामविकास निधी यासारखी अनेक कामे या अर्थसंकल्प अधिवेशनात व्हायला हवी होती. परंतु या कामांना अजून प्रतीक्षा यादीत रहावे लागणार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत हे मुद्दे प्रचाराच्या ऐरणीवर येतील अशी शक्यता यावेळी तळेकर यांनी बोलून दाखवली तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत यातील एकही प्रश्नाचा अथवा कामाचा प्रभाव पडणार नसून केवळ रेल्वे गाडी थांबा आणि जातेगाव ते टेंभुर्णी रस्ता या दोन प्रश्नावर करमाळा तालुक्यातील जनता मतदान देणार अथवा विरोधात जाणार असे चित्र असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button