संपादकीय

आमदार संजय मामा शिंदे यांनी राजकीय सूडबुद्धीतून पाच वर्षातून एकदाही वडशिवणे गावाला पाणी दिले नाही,,, माजी आमदार पाटील गटाचा आरोप

करमाळा प्रतिनिधी

आमदार संजय मामा शिंदे यांनी वडशिवणे तलाव परिसरातील गावांवर राजकीय सुड उगवला, पाच वर्षात एकदाही पाणी दिले नाही असा घणाघाती आरोप माजी आमदार नारायण पाटील गटाकडून करण्यात आला. याबाबत सविस्तपणे बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर म्हणाले की आज करमाळा तालुक्यातील बरेच पाणी साठे कोरडे पडले आहेत. याला कारणीभूत विद्यमान आमदार महोदयांनी दहीगाव उपसा सिंचन योजना व्यवस्थित पणे वापरली नाही हेच आहे. उजनी सारखा समुद्र करमाळा तालुक्याच्या उशाला असून आणि दहिगाव उपसा सारखी मोठी उपसा सिंचन योजना हाती असून वडशिवने तलावात पाणी आणता येत नाही या मागे कोणते कारण आहे. दोन पंप हाऊस आणि साडे सातशे हॉर्स पॉवर असलेल्या दहा मोटारी हाती असतानाही दहीगाव उपसाचे पाणी वडशिवणे तलावात आणू न शकलेल्या आमदार महोदयांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. सन २०१४ ते १९ दरम्यान तत्कालीन आमदार नारायण (आबा) पाटील यांनी अथक प्रयत्न करून वडशिवणे तलावात उजनीचे पाणी पोहचले होते. यामुळे मग आता विद्यमान आमदार महोदय यांना केवळ आयत्या चारीतून पाणी वडशिवणे तलावात पोहच करावयाचे आदेश संबंधित विभागास द्यायचे होते. परंतु केवळ राजकीय द्वेष भावनेतून त्यांनी वडशिवणे तलावात पाणी देण्याचे टाळले. करमाळा तालुक्यातील मांगी तलावानंतर पाणी साठवण क्षमतेत वडशिवने तलाव येतो. आज जर पावसाळी आवर्तन देताना दक्षता बाळगून पूर्व भागातील सर्व पाणी साठे म्हणजेच तलाव, बंधारे, शेततळी भरून घेतली असती तर पिण्याच्या पाण्यासाठी लोकांवर टँकर मागणीची वेळ आली नसती. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे हक्काचे १.८ टी एम सी पाणी शेतकऱ्यांना मिळवून देण्यात या पाच वर्षात आमदार संजय मामा शिंदे अपयशी ठरले असल्याचा आरोप यावेळी पाटील गटाकडून करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button