सामाजिक

नुकसान भरपाई शिवाय रस्त्याचे काम करू देणार नाही रिपाइं (आठवले)

वेळापुर प्रतिनिधी आकिल कोरबू

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

मो.8600251162

वेळापुर (ता.माळशिरस) येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी राष्ट्रीय महामार्ग दक्षिण बाजुकडील निम्या गाळेधारक व टपरीधारकाना अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच दक्षिण बाजुला सर्विस रोड नसल्याने तेथील छोटे मोठे व्यवसाय ठप्प झाले व त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे गाळेधारकांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी रिपाइं (आठवले)माळशिरस तालुक्यांच्या वतीने तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आले स्थानिक प्रशासन व अवताडे कन्ट्रक्शन यांच्याकडून व पोलीस बळाचा वापर करून गाळेधारक यांना त्रास देण्याचे काम करू नये व आम्हाला 7 मार्च पर्यंत नुकसान भरपाई न दिल्यास 11 मार्च रोजी रिपाइं आठवले यांच्या वतीने गाळेधारकासोबत प्रांतधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहेत्यावेळी रिपाइं ( आठवले) माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे धडाडीचे कार्यकर्ते अल्ताफ कोरबू, किरण धाईजे , अजित मोरे, प्रवीण साळवे, स्वप्निल सरवदे ,अकलूज युवक अध्यक्ष अभिजीत वाघमारे, बंडुलाल आतार, मंगेश जाधव, आलम बागवान ,अजित कुमार देशपांडे ,अनिल सागर, इकबाल आतार ,नामदेव सागर आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button