मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बसस्थानक कात टाकणार!खोके धारकांना जागा खाली करण्याच्या नोटिसा
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
संगमेश्वर: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आणि संगमेश्वर तालुक्याच्या मध्यवर्ती असलेले संगमेश्वर बस स्थानक कात टाकणार आहे. गेले अनेक वर्ष बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमेश्वर बस स्थानक नूतनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत हे बांधकाम होणार आहे. संगमेश्वर बस स्थानक अनेक वेळा समस्येच्या गर्दीत अडकले होते अनेक वेळा परिसरात दुर्गंधी सह भिंतीही धोकादायक बनलेले आहेत. सर्व सुविधांनी युक्त असे संगमेश्वर बस स्थानक होणार आहे . त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस स्थानकाच्या आवारातील खोकेधारकांना आदेश वजा नोटीस काढून खोके खाली करण्यास सांगितले आहे . संगमेश्वर बस स्थानकाचे बांधकाम ठरलेल्या ,मुदतीमध्ये पूर्ण हवे अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीमध्ये चिपळूण व रत्नागिरी बस स्थानकाचे काम रखडले आहे त्यामुळे तेथील प्रवासी वर्ग खोके धारक व्यवसाय संकटात आहे . त्याचप्रमाणे या ही बस स्थानकाचे काम रखडले जाण्याची शक्यता प्रवासी वर्गाकडून वर्तवण्यात येत आहे तसेच पावसाळाही जवळ आला असून त्यापूर्वी काम होणे आवश्यक आहे तसे न झाल्यास सर्वांनाच त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.