महाराष्ट्र

आदिनाथ कारखान्याच्या निवडणूकीत यूवकांना संधी देण्याचा माजी आमदार नारायण पाटील यांचा विचार

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

आदिनाथ कारखान्याच्या निवडणूकीत यूवकांना संधी देण्याचा माजी आमदार नारायण पाटील यांचा विचार असून त्यानूसार सभासदांचे मत जाणून घेण्यासाठी एका नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या आखणीस सुरुवात झाली असल्याचे पाटील गटाकडून सांगण्यात आले.करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा प्रशासक आल्यानंतर थांबली असली तरी भविष्यात ही निवडणूक होणारच असल्याने राजकीय गट मात्र निवडणूक पुर्व तयारीला लागले आहेत.

पाटील गटानेही या निवडणुकीसाठी सभासदांचे मत जाणून घेण्याचे ठरवले असून याबाबत सविस्तर माहिती देताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ कारखान्याच्या निवडणूकीत युवकांना संधी दिली जाणार असून याबाबत स्वतः मा आ पाटील यांनीच तालुक्यातील निरपेक्ष व सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या युवकांनी आता सहकारी चळवळीत हिरीरीने भाग घेतला पाहिजे अशी इच्छा बोलून दाखवली. आदिनाथ कारखान्याच्या निवडणूकीसाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सभासदांची प्रथम क्रमांकाची पसंदी असणार आहे.

आदिनाथ कारखान्याच्या आजवरच्या अधोगतीवर बरोबरच भविष्यात या कारखान्यासमोरील आव्हानाबाबत गंभीरतेने चर्चा झाली पाहिजे असे माजी आमदार नारायण पाटील यांचे मत असून आता कोरी पाटी असलेले व आधूनिक पद्धतीने शेतीचे ज्ञान असलेले अनेक तरुण उजनी पट्ट्यात आहेत. सहकाराचे महत्त्व ही तरुण मंडळी चांगले जाणून आहेत. या युवा सभासदां मधूनच आदिनाथ कारखान्यासाठी वेळ व योगदान देणार्‍या युवकांचा शोध पाटील गटाकडून घेणे सुरु असून कारखाना मतदार यादीतील सर्व विभागांना नजरेसमोर ठेऊन नियोजन सुरू आहे. युवकांसमवेतच सहकारातील अनूभवी जेष्ठ मंडळी यांचे प्रमाणबद्ध पॅनल माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ कारखान्याच्या निवडणूकीत उतरवले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button