मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक संकुलात आज मराठी भाषा गौरव दिन

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
कवी कुसुमाग्रज जयंती महोत्सव संपन्न होणार रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड ,कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड आणि कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय समिती मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज जयंती महोत्सव मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक संकुलात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांचे हस्ते होणार आहे. तसेच संपूर्ण कार्यक्रम त्यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरीच्या जिल्हा शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, पंचायत समिती रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, केंद्रीय कोमासाचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर, मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच श्वेता खेऊर, जयगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज जयंती महोत्सवानिमित्त माजी प्राध्यापक हनुमंत कदम यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता अभिवाचन, दुपारी साडेतीन वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व साडेपाच वाजता समारोप असा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ▪या संपूर्ण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कवी व साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मालगुंड कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील , कोमसाप मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, कार्याध्यक्षा शुभदा मुळये, सचिव विलास राणे, कोमसाप युवाशक्ती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अरूण मोर्ये, कोमसाप मालगुंड युवाशक्ती प्रमुख अमेय धोपटकर आदींनी केले आहे.



