विशेष

राजाराम साळवी यांच्या हस्ते विरार चंदनसार येथे आगरी सेना पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाला खासदार राजेंद्र गावित यांची उपस्थिती

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

आगरी सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास पाटील (काका) यांच्या 57 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आगरी सेना भव्य मेळाव्यात आगरी सेना पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन आगरीसेना संस्थापक राजारामजी साळवी यांच्या हस्ते बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी विरार चंदनसार येथे पार पडले.यावेळी पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित, कामगार नेते प्रदिप साळवी,युवानेते राहुल साळवी,मुंबई प्रदेश अध्यक्ष जयेंद्र खुणे,पालघर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चेतनदादा गावड,वसई काॕग्रेश प्रदेशाध्यक्ष -विजय शेठ पाटील ,शेलार, मोरेश्वर पाटील,अंदाडे, व पालघर महिला अध्यक्षा मनिषा पाटील,मोहन पाटील,जयेश पाटील,भूपेंद्र पाटील,संदानद पाटील,मंगेश पाटील सदर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

दुसऱ्या सत्रात कोरोना काळातील आपल्या अथक कामगिरीने दिल्ली पर्यत दखल घ्यायला लावणाऱ्या राष्ट्रपती पूरस्कारप्राप्त सौ.सुजाता तुस्कानो यांनी आपल्या विपुल साहित्यातुन जनजागृती करीत समाजातील समस्या पुढे आणणारे आगरी समाजातील साहित्यिक संजय पाटील मायखोपकर याचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले.वसई येथील आदिवासी भागात टॕकर हटाव मोहिमेत आंदोलन करणाऱ्या आदिवासी महिला तसेच न्युज चॕनेलचे संपादक व पत्रकार यांचाही या आगरी मेळाव्यात सत्कार करण्यात आले. व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पालघर खाजदार राजेंद्र गावित यांच्याकडे कैलासजी पाटील यांनी हजारोच्या उपस्थितीत केळवारोड येथील आगरी भवन व डहाणू येथील काही आदिवासी पाड्यातील मुलभुत समस्या साठी निधी मागणीचे निवेदन सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button