आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आवाटी येथील दर्ग्यात घेतला इफ्तार पार्टीचा आस्वाद

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
संपूर्ण जगात रमजान महिन्यात मुस्लिम समाजाचे रमजानचे रोजे (उपवास)चालू असून या रोजाला इस्लाम धर्मात अनन्य साधारण महत्व आहे त्या अनुषंगाने युवकांचे श्रद्धास्थान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज आवाटी ता.करमाळा जि. सोलापूर येथे हिंदु मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले हजरत “चाँद पाशावली बाबा ” यांच्या दर्गाह येथे भेट देवुन दर्शन घेतले

तसेच पवित्र रमजान निमित्त आवाटी पंचक्रोशीतील व इतर भागातून आलेल्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा घेऊन इफ्तार पार्टीत सहभागी झाले यावेळी मुस्लीम बांधवांबरोबर मस्जिद येथे अजान मध्ये सहभाग नोंदवला तसेच रोजा इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला.

प्रसंगी माजी आमदार नारायणआबा पाटील,अजित तळेकर, साबीरखान,राजु खान,नसरुल्लाह खान,युसुफ जहागिरदार,यशवंत बंडगर,गोकुळ नलवडे, राजाभाऊ, शिंदे,संतोष सोनवर,लखन चिर्के,तात्या गोडगे,महेश पाटील तसेच बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते