सहकार महर्षी कारखान्याची सुनावणी पूर्ण.

लक्ष्मीकांत कुरुडकर.अकलूज (प्रतिनिधी)
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या हरकतीवर सुनावणी दिनांक 27/ 3. 2023 रोजी साखर सहसंचालक कार्यालय सोलापूर येथे निवडणूक जिल्हाधिकारी दराडे साहेब यांनी पार पाडली. या सुनावणी संदर्भात कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी त्या चार सहकारी संस्थेची भाग भांडवल अपुरे होतं ते पूर्ण आहे असं दाखवलं नव्या व दहाव्या महिन्यात 2022 साली ह्या चारी संस्थेच्या सचिवांनी सहकार महर्षी कारखान्याचे थकीत भाग भांडवल भरलं आहे
गेले साठ वर्ष हे मी थकीत भाग भांडवल भरलं नाही पण अचानक एकाच महिन्यात चारी संस्थेने थकीत भाग भांडवल भरले तक्रारदार मार्फत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा विचार घेऊन व कैलासवासी न्यानेश्वर सालगुडे पाटील यांची ज्येष्ठ चिरंजीव शंकर बचाव चे अध्यक्ष इंजिनियर भानुदास सालगुडे पाटील यांनी म्हणणं मांडलं कारखान्याचे बँक स्टेटमेंट पाहिल्याशिवाय व भाग भांडवल बँकेत जमा झाले असल्याशिवाय हा निर्णय देऊ नये अशी मागणी केली आहे.
रणजीत सिंह विजयसिंह मोहिते पाटील हे दोन विकास सोसायटीत ना क्रिएशन सभासद कशी होऊ शकतात हा मोठा तिथला प्रश्न आहे मदनसिंह शंकराव मोहिते पाटील हे शंकराव मोहिते पाटील बिगर शेती पतसंस्थेत न आलेले आहेत ते पतसंस्था मागील दहा वर्ष बंद आहे क वर्गात आहे 90% एमपी मध्ये आहे आणि ती संस्था पण अक्रिएशन आहे व सभासद पण अक्रिएशन आहे त्या संस्थेत मदन सिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या कुटुंबालाच कोट्यावधी रुपये कर्ज दिलेला आहे व ती थकलेला आहे त्यामुळे मदन सिंह मोहिते पाटील यांना सहकार कायद्याप्रमाणे व पणन कायद्याप्रमाणे त्यांना कुठेही संचालक होण्यास अपात्र होतात त्यामुळे मदनसिंह मोहिते पाटील यांना सहकार महर्षी साखर कारखाना व अकलूज मार्केट कमिटी मध्ये फॉर्म भरता येणार नाही तो फॉर्म भरल्यास बाद होईल.
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात ज्या सहकारी सहकारी संस्थेने प्रतिनिधीचे ठराव दिलेत ते मासिक मीटिंगची आहेत पण महाराष्ट्र सहकार कायद्याप्रमाणे साखर कारखान्याला प्रतिनिधी पाठवायचे असेल तर ती त्या संस्थेची जनरल मीटिंगची ठराव लागतेत असं 2014 चा महाराष्ट्र शासनाचा गॅजेट आहे त्यामुळे हे सर्व चारी सहकारी संस्था मतदार यादीत नाव वगळण्यात येणार आहेत याची नोंद घ्यावी.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्यामार्फत सीनियर वकील एडवोकेट दिलीप पडे ऍडव्होकेट खराडी वकील एडवोकेट पराडे यांनी काम पाहिलं व चारी सहकारी संस्थेची वकील म्हणून कोल्हापूरचे प्रमोद पाटील यांनी काम पाहिले कारखान्याचे. सेक्रेटरी व इतर स्टाफ पण हजर होते ही सुनावणी लगबग दोन तास चालली.



