विशेष

“मरळनाथपूर” ता.वाळवा जि.सागंली हे गाव महाराष्ट्रातील पहीले सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून ओळखले जाणार

सांगली जिल्हा प्रतिनिधी :

आनंद सावंत,

टाईम्स 9 मराठी न्यूज, मो.8007932121

सांगली: आदरणीय सदाभाऊ खोत यांचे “मरळनाथपूर” ता.वाळवा जि.सागंली हे गाव महाराष्ट्रातील पहीले सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून ओळखले जाणार.माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नामुळे राज्याचे ऊर्जा मंत्री तथा उप मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली “मरळनाथपूर” या आपल्या गावाला १००% सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून ‘महाराष्ट्रातील पहील्या पायलट प्रोजेक्ट’ अशी मंजूरी मिळाली आहे.

सदरच्या प्रकल्पामुळे गावातील सर्व घरे, ग्रामपंचायत ऑफिस, पाणीपुरवठा योजना, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्था यांची ऊर्जेची १००% टक्के गरज भागणार असून हे गाव सौरऊर्जा स्वयंपूर्ण होणार आहे. त्याबद्दल मा.आ. सदाभाऊ खोत यांचा मरळनाथपूर गावामध्ये जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला.

यावेळी सदर प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल सदाभाऊ खोत यांनी राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गावाच्या वतीने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button