“लोकप्रधान” न्यूज चा उत्कृष्ठ सामाजिक संस्था पुरस्कार सोलापूर च्या “शाहीन फाउंडेशन” ला…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
लोकप्रधान न्युज नेटवर्क च्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर च्या “शाहीन फाउंडेशन” ला उत्कृष्ठ सामाजिक संस्था हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले,हा पुरस्कार शाहीन फाउंडेशन चे प्रमुख उमरभाई (M राऊंड),जिलानी कुरेशी,मिनहाज हत्तूरे,बाबा कुरेशी,सईद नायकवडी,राजा बागवान यांच्या सह फाउंडेशन चे सर्व सदस्यांनी स्वीकारला…
या वेळी व्यासपीठावर MIM चे हाजी फारूकभाई शाब्दी,माजी महापौर आरीफभाई शेख,मा स्थायी समिती सभापती चेतन नरोटे,माजी महापौर महेश कोठे,अहले हदिस जमात सदर आणि बागवान जमात सिटी ट्रस्ट चे “लवाद समिती” चे सदस्य हाजी मुखत्यार (नाना) हुमनाबादकर,”उद्योगरत्न” पुरस्काराचे मानकरी हाजी मुश्ताकभाई (M राऊंड),तौफिकभाई शेख (पैलवान) यांच्या सह लोकप्रधान न्यूज नेटवर्क चे अय्याजभाई शेख उपस्थित होते…
सालाबाद प्रमाणे याही वर्षी “लोकप्रधान” तर्फे सोलापुर च्या औद्यागिक,सामाजिक,राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आणि सामाजिक संस्थांना गौरविण्यात येते,याही वर्षी “शाहीन फाउंडेशन” ने साठ (60) जोडप्यांची विवाह गाठ बांधत एक चांगला सामाजिक संदेश समाजाला दिल्याने त्यांच्यावर हि सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…
यावेळी टाइम्स 9 न्यूज नेटवर्क चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्याशी भ्रमणध्वनी वर बोलताना शाहीन फाउंडेशन चे प्रमुख उमरभाई (M राऊंड) म्हणाले की,हा पुरस्कार नक्कीच आम्हा सर्वांसाठी आनंददायी असुन ह्या पुरस्काराने आम्हां सर्वांची जबाबदारी वाढली असुन,इथुन पुढच्या काळात हि शाहीन फाउंडेशन समाजाच्या प्रती आपले योगदान देत राहील असा विश्वास व्यक्त केला…