पालघर जिल्ह्यातील वाडा उपविभागात 32 लाखाची वीज चोरी.. विहित मुदतीत रक्कम न भरणाऱ्या विरुद्ध विद्युत महामंडळ करणार पोलीस कारवाई
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640
महाराष्ट्र विद्युत मंडळाने पालघर जिल्ह्यातील वाडा उपविभागात जानेवारी 2024 या कालावधीत 79 वीज चोरी करणाऱ्या वीज चोरांवर कारवाई केली होती.
या वीज चोरट्यांनी एकूण 32 लाख 58 हजार रुपये किमतीची एक लाख 50 हजार 494 युनिट विजेची चोरी केली होती.
या वीज चोरी केलेल्या चोरट्यांनी विहित मुदतीत ही रक्कम न भरल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल असे विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई मुख्य अभियंता कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली असून पालघर जिल्ह्यातील वाडा उपविभागातील वाडा, बिलावली, अशोक वन, आमगाव, आयकर पाडा, डोंगस्ते, देवघर, काटी, जामधर, उंबरखांड, नेपाळे,खांबाळे, महाप, खरीवली, दिघाशी, जांबिवली, शिरोळे, बासे, वापे, चिंचघर, पाच्छापूर या गावात ही वीज चोरीची मोहीम राबवण्यात आली आहे. या सर्व वीज चोरट्यांनी दिलेल्या मुदत कालावधी वीज भरणा न केल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल अशी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या गावकऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे.