महाराष्ट्र

पुणे भागातील धरणामधुन उजनी धरणात 10 टि एमसी पाणी सोडण्याची प्रा रामदास झोळ सर यांची रास्ता रोको आंदोलन प्रसंगी मागणी.अन्यथा सिंचन भवन पुणे येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण सध्या मायनसमध्ये गेल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी सर्वसामान्य जनता याकरिता पुणे भागातील 19 धरणातील दहा टीएमसी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करमाळा तालुक्याचे नेते प्रा. रामदास झोळसर यांनी भिगवण येथे उजनी धरणग्रस्त समिती शेतकरी बांधवांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात प्रसंगी व्यक्त केले.

सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाने बार्शी, माळशिरस, सांगोला,माढा,करमाळा आदी तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित केले आहे .या उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर नगर पुणे जिल्ह्यासह अनेक गावे लाभक्षेत्रात आहे.यंदाच्या वर्षी उजनी धरण क्षेत्रात समाधानकारक रित्या पाऊस न झाल्याने उजनी धरणात अतिअल्प साठा शिल्लक होता.उजनीधरणात साठ टक्के पाणी शिल्लक असताना कालवा समितीच्या शिफारशीनुसार पाणी सोडण्यात आले.यामुळे उजनी धरण सध्या मायनसमध्ये गेले आहे.

उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड आदी शहर व ग्रामीण भागाच्या पिण्याच्या उद्योगाचा व शेतीसाठीचा पाणी पुरवठा अवलंबून आहे.तसेच सोलापूर पुणे, नगर जिल्ह्यातील पेयजल योजनेअंतर्गत समावेश असलेल्या गावांना सुध्दा उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.आगामी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता उजनी धरणातील पाणीसाठयावर सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील उपरोक्त बाबी अवलंबून असताना अतिअल्प राहिलेल्या पाण्याचे नियोजन कसे होणार आहे.

यावर्षी महाराष्ट्र शासनाने जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा कमी असुन देखील या धरणांमधुन 8.7 टी एम सी पाणी सोडण्यात आले आहे.पावसाळयात पुणे जिल्ह्यातील ज्या धरणाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी उजनीत सोडले जाते.यंदा सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत.त्याच 19 धरणातील आता उजनीसाठी 10 टि एमसी पाणी जायकवाडी पॅटर्नप्रमाणे उजनीत सोडण्यात यावे.म्हणजेच यामुळे सोलापूर, पुणे,व नगर जिल्ह्यातील शेती, उद्योग, पिण्यासाठी लागणार्या पाण्याच्या भविष्यात उद्भवणारे अडचणी दूर होतील.

उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील 19 धरणातुन 10 टि एमसी पाणी सोडण्याच्या बाबत संबंधीताची लवकरात लवकर बैठक घेऊन आमच्या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा अन्यथा वरील धरणांमधून दहा टीएमसी पाणी न सोडल्यास आपणास कोर्टात धाव घेऊन न्याय मिळावावा लागणार आहे.उजनी धरण पाणी वाटप नियोजनानुसार झाले पाहिजे.या करीता कालवा समितीमधील राजकीय हस्तक्षेप बंद करण्यासाठी कालवा समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून परिस्थिती सांगितली पाहिजे कारण त्यांच्याकडे जाणारे पाणी उजनीचे असल्यामुळे बारामती इंदापूर बरोबर सोलापूर जिल्ह्यातील गावाचा विचार करून वरील धरणांमधून दहा टक्के पाणी सोडण्यात येईल.याबाबत तोडगा निघाला नाही तर सिंचन भवन पुणे येथे आंदोलन करणार असुन यातुन न्याय न मिळाल्यास कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले आहे .या आंदोलनाला उजनी धरणग्रस्त शेतकरी समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button