एकच लक्ष मुस्लिम आरक्षण साठी शफीक शेख यांचे आमरण उपोषण
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते शफीक करीम शेख यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या एकमेव उदात्त हेतूने 31 जानेवारी पासून पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुका मुस्लिम समाजा तर्फे जाहीर पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातील असंख्य मुस्लिम समाज बांधवांनी हजेरी लावली…
उपोषण स्थळी ओबीसी महा संघा सह अनेक संघटनांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शफीक शेख यांना पाठिंबा देत आपण हि या उपोषणास सहभागी असल्याचे पत्र दिले,
यावेळी माळशिरस मुस्लिम समाजाचे नेते ॲड.वजीर शेख,सामाजिक कार्यकर्ते सलिमभाई मुलाणी
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग (शरद पवार गट),जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेख,मुंडेवाडी गावचे माजी उपसरपंच अतिक मुलाणी,भाजपा अल्पसंख्यांक विभाग सांगोला चे विधानसभा संयोजक गुलाब मुलाणी सह बहुसंख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते…