विशेष

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज खान यांच्या पथकाची कारवाई.. 3 आरोपींसह 1 करोड रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

उत्पादन शुल्क विभाग अवैध मध्य साठा व वाहतुकीवर मद्य तस्करांकडून मोठ्या प्रमाणावर मद्य तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील दापचरी सीमा तपासणी नाक्याजवळ गुरुवारी उघडकीस आला आहे .महाराष्ट्रात विक्रीस आणि वाहतुकीस बंदी असलेलं दादरा नगर हवेली बनावटीच मद्य बेकायदेशीर रित्या महाराष्ट्रात वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने धडक कारवाई करत 1 करोड कृपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. . मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मधील दापचरी जकात नाक्यावर ही कार्यवाही गुरुवारी करण्यात आली आहे. मद्य वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह एक ट्रक जप्त केला या बरोबर 3 आरोपी ना अटक करण्यात आली आहे . राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने बुधवारी पासुन महामार्गावर पाळत ठेवून गुरुवारी सकाळी गुजरात मुंबईकडे जाणाऱ्या एका टेम्पो तर धुंदलवाडी आंबोली जवळ एका ट्रकला संशयित रित्या पकडून त्यांच्या वर कार्यवाही केली आहे . या सर्वांना ताब्यात घेउन जवळपास 1 करोड किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

Advertisement

टेम्पोत व ट्रक मध्ये असलेलं मद्य वाहतूक करताना कोणाच्या निदर्शनास येऊ नये म्हणून या बॉक्सच्या मागे चिंध्या भरलेल्या गोणी ठेवण्यात आल्या होत्या. मिळालेल्या गुप्त माहिती नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे . राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज खान यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत 700 हून अधिक महागड्या मद्याचे बॉक्स जप्त केले आहेत . तिन आरोपी मधे ज्वाला दीनदयाल सिंग ,राजेंद्र सिंग व समीर रमजान शेख आशी नावे आहेत.या प्रकरणात पुढील कार्यवाही मुंबई भरारी पथकाकडून सुरू करण्यात आली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button