वाडा तालुक्यातील मंडळ अधिकारी किरण राठोड आणि तलाठी चैत्राली कुटे यांना लाच स्वीकारताना केली पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी रंगेहात अटक
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
वडिलांच्या मालकीच्या जमिनीच्या सातबारावरील मयत नातेवाईकांची नावे कमी करून त्यांच्या वारसाची नावे नोंदवण्यासाठी दिलेल्या अर्जाची चौकशी करून ही दोन्ही कामे करून देण्यासाठी अर्जदारांकडे 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी किरण शंकर राठोड वय वर्ष (47)मंडळ अधिकारी काने तालुका-वाडा, जिल्हा-पालघर यांच्यासह चैत्राली किशोर कुटे वय वर्ष (34) तलाठी सजा काने तालुका-वाडा, जिल्हा-पालघर या दोघांना अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 16.21 वाजता हॉटेल कोकण किनारा वाडा-काने येथे अर्जदार यांच्याकडून पंचा समक्ष लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्यांच्याविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. ही यशस्वी कारवाई सुनील लोखंडे (पोलीस अधीक्षक लाचलूजपत प्रतिबंधक ठाणे परिक्षेत्र) व अनिल घेरडीकर ( अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्र ) आणि सुधाकर सुराडकर ( अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्र ) यांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद गावडे पोलीस उपअधीक्षक पालघर विभाग, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार दीपक सुमडा, पोलीस हवालदार अमित चव्हाण,पोलीस हवालदार संजय सुतार, पोलीस हवालदार नवनाथ भगत, पोलीस हवालदार नितीन पागधरे, पोलीस हवालदार योगेश धारणे, पोलीस हवालदार विलास भोये, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, आणि पोलीस शिपाई जितेंद्र गवळे,पोलीस शिपाई सखाराम दोडे या पथकाने यशस्वीरित्या पार पडली आहे.