महाराष्ट्र

करमाळा पोलीस खात्यात नवा राजा नवा डाव, आता सगळं काही कायद्यानुसार नूतन पोलीस निरीक्षक घुगे यांच्या नियमावली मुळे करमाळा करांना मिळणार शिस्तीचे धडे

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

मागील आठवड्यात सोलापूर जिल्हा पोलिस प्रशासनात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. करमाळा पोलीस स्टेशन तथा करमाळा तालुक्याच्या पोलीस निरीक्षक पदी विनोद घुगे यांनी पदभार स्वीकारला. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी पदभार स्वीकारला असता आता तालुक्याला कडक तहसीलदार मिळाल्या अशी चर्चा चालू असतानाच पोलीस निरीक्षक गुंजवटे यांच्या जागी आता विनोद घुगे आले. त्यांच्या आगमना बरोबरच सामाजिक, राजकीय, मानव हक्क पत्रकार संघ आदी संघटना व पक्षाच्या नेते मंडळींनी घुगे यांची भेट घेऊन सत्कार केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. वास्तविक पाहता करमाळा तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी फार मोठे निर्णय घ्यावे लागतात. राजकीय गट आणि ढीगभर पक्षाचे प्रमुख या तालुक्यात असल्याने सतत राजकीय हस्तक्षेप होत असतो.यामुळे आता विनोद घुगे कशाप्रकारे या गोष्टी हाताळतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. घुगे यांनी प्रथम करमाळा पोलीस आवारातील जागा मोकळी करायला लावली. अपघातात तसेच हरवले असलेल्या, गुन्ह्यात पकडलेल्या दुचाकी गड्या गेली तीस वर्षे या आवारात साठवून ठेवल्या जातात.पण घुगे यांनी हा परिसर रिकामा केला. शहरातून पाठ संचालन केले. करमाळा शहराच्या ट्रॅफिक आणि मोकार कुठेही पार्किंग या समस्येने करमाळा शहरवासी वैतागले असत. पण घुगे यांनी या मुद्द्याला हात घातला आणि पन्नास पोलिसांचे मोठे पथक बरोबर घेऊन मुख्य रस्ते रहदारी साठी रिकामे केले.यामुळे सर्वत्र घुगे यांची चर्चा चालू आहे. अजून घुगे यांनी इतर अवैध धांद्याकडे आपला मोर्चा वळवला नाही.यामुळे येत्या काही आठवड्यात घुगे यांची कार्यशैली सर्वांना समजणार आहे. सध्या तरी बरेच नागरिक घुगे यांचे कौतुक करत आहेत तर काही अनुभवी मंडळी मात्र नव्याचे नऊ दिवस असतात.परत ये रे माझ्या मागल्या अशीच गत होत असते अशी संमिश्र प्रतिक्रिया देताना आढळून आले. आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button