नारी शक्ति सन्मान,विधवा महिले हस्ते ध्वजारोहणटेंभी ग्रा. पं.अगळावेगळा उपक्रम.
प्रतिनिधी:-मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय, टेंभी यांनी एक आगळा वेगळा उपक्रम आज राबविला आहे… स्त्री ला सन्मान मिळावा या प्रमुख हेतूने प्रेरित होऊन ग्रामपंचायत कार्यालय टेंभी यांनी नारी शक्तीचा सन्मान म्हणून गावातील विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मानस दाखविला. ही विशेष बाब आज टेंभी येथे पहावयास मिळाली. आणि त्याला प्रत्यक्षात उतरवण्याच्या हेतूने सरपंच अमोल चिकने तथा उपसरपंच पंजाब सोळंके आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी प्रयत्न केले . आणि ही संकल्पना साकार केली…
सर्व प्रथम संपूर्ण गावातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा ,टेंभी आणि साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची टेंभी ग्रामातून प्रमुख मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली. त्यांनतर ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण श्रीमती. छायाताई गोपाळराव हातामोडे यांच्या हस्ते, पशु वैदकीय दवाखाना येथील ध्वजारोहण श्रीमती. संगीताताई सतीश मस्के यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा, टेंभी येथील श्रीमती. पल्लवीताई दिपकराव सोळंके याच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत गीत गायन, लेझिम, मनोरा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले..संध्याकाळी लहान लहान बालकांचा सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत होणार आहे….
“यत्र नारी : पूज्यते, तत्र रमनते देवता :” याप्रमाणे उक्ती ला सार्थ ठरवत, स्त्री ही देवतेचे रूप आहे.तिचा सन्मान सर्वांनी केलाच पाहिजे .जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी! स्त्री ही जगदंबेचा,चंडीकेचा अवतार आहे.ज्यांच्या पतीचे छत्र अवेळीच हरविलेल्या विधवा महिलांचा हस्ते ध्वजारोहणा करून टेंभी ग्रामपंचायतीने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे… ही खूप कौतुकाची बाब असल्याचे सर्व गावकर्यातून बोलले जात आहे..!!