नारपोली भिवंडी ठाणे शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक माधवी राजे कुंभार यांनी केली रंगेहात अटक
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी नारपोली पोलीस ठाणे भिवंडी शहर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांनी 05 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून 02 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी त्यांना अँटी करप्शन ब्युरो ठाणे पोलीस उपअधीक्षक माधवी राजे कुंभार यांच्या पथकाने मंगळवारी रंगेहात अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
( 38) वर्षीय महिला तक्रारदार यांच्या मुलाच्या विरुद्ध भिवंडी नारपोली शहर पोलीस ठाण्यात (302)कलमा प्रमाणे खुणाचा गुन्हा दाखल आहे. म्हणून या गुन्ह्याचे तपासी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार (37)यांनी या महिलेला त्यांच्या मुलाला त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये व चार्जशीट दाखल करताना त्याला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी 05 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती . याबाबत तक्रारदार महिलेने या तपासी पोलीस अधिकाऱ्याची लेखी तक्रार अँटीकरप्शन ब्युरो ठाणे कार्यालयात केली होती.
या तक्रारीची पडताळणी करून सुनील घेरडीकर(पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र)व अनिल घेरडीकर (अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली माधवी राजे कुंभार पोलीस उपअधीक्षक ठाणे व सहाय्यक पोलीस फौजदार एस. आर. खान, पोलीस हवालदार एम. ए. बजागे, महिला पोलीस हवालदार एम.ए. तेटंबे, सहाय्यक फौजदार चालक चौधरी या पथकाने मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सापळा रचून पंचासमक्ष नारपोली पोलीस ठाणे भिवंडी शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून 02 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.