कर्नाटकातील भाजपच्या उमेदवारांना पराभूत करून काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी केले हे गोरगरीब जनतेच्या सहनशीलतेचा विस्फोट आहे

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
कर्नाटकातील मतदारांनी केंद्रसरकार विरोधातील राग ,प्रचंड असंतोष आज मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला .कर्नाटकातील लाजिरवाणा पराभव हा भारतातील सर्व राज्यातील भाजपच्या विनाशाचा श्रीगणेशा ठरणार का ???
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. कर्नाटक मध्ये वाढलेली बेरोजगारी ,महागाई यामुळे जनतेच्या मनात विद्यमान सरकारबद्दल प्रचंड चीड होती .कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी ठरवून भाजपच्या राज्यकर्त्यांना, भाजपच्या उमेदवारांना पराभूत करून घडवली . कर्नाटकातील काँग्रेस पक्षाचा विजय हा तेथील गोरगरीब जनतेच्या सहनशीलतेचा विस्फोट आहे .भारत जोडो यात्रा च्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी भारत पिंजून ,सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड आपुलकी निर्माण केली . 10-10 तास चालत अनेक शहराला भेट देत काँग्रेस पक्षात नवचैतन्य आणले . पंतप्रधान एकही *पत्रकार परिषद घेत नसताना ,भारत देशासाठी ज्यांनी स्वातंत्र्य दिले अशा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा वारस ,राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा यशस्वी केली .
भाजपच्या पराभवाचे शल्य हे श्रेष्ठींना असेलच, पण त्यापेक्षाही सर्वाधिक दुःख हे संपूर्ण गोदी मीडियाला असणार आहे .ज्यांनी महागाई -बेरोजगारी व वस्तुस्थिती न दाखवता चुकीच्या बातम्या दाखवल्या. व गोदी शेठ चे उदो – उदो केले . कर्नाटक मधील 17 आमदार जे काँग्रेस मधून भाजपा मध्ये गेले होते ,त्यातील तब्बल 15 आमदारांना जनतेने “नाकारत” त्यांना पराभूत करण्याची किमया केली . हा निकाल महाराष्ट्रातील खोके घेणाऱ्या आमदारांसाठी एक झणझणीत चपराक व “धडा” आहे .
कर्नाटकातील या निकालावरून महाराष्ट्रातील मिंधे सरकार मधील 40 आमदारांचे धाबे दणालले असावेत . उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सहानुभूती व जनतेचे -प्रेम आहे . आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात त्या 40 आमदारांचे डिपॉजिट जप्त होईल का ?? असा प्रश्न निर्माण झाला आहे . विद्यमान सरकारमधील केवळ 5 आमदार निवडून येतील अशी शक्यता आहे .शिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडी साठी व प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते .अजित पवार यांच्यासाठी “कर्नाटक निकाल ” हा एक “धडा” शिकवणारा हा “निकाल” असणार आहे.
कर्नाटक विधानसभा निकालाची, असंतोषाची – नाराजीची ही “आग” संपूर्ण भारतात पेटणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे . भाजपा विरोधाचा हा “वणवा” काँग्रेस आणि “समविचारी” पक्षासाठी एक मोठे टॉनिक व सत्ताधारी पक्षासाठी दाणादाण करणारी ठरणार आहे .

इकबाल मुल्ला ( पत्रकार )
संपादक – सांगली वेध ,संपादक – वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल – 8983587160



