शहर

पालघर जिल्ह्यातील अनेक गावातील वादळी पावसामुळे नुकसान झालेले घरमालक शासकीय मदतीपासून वंचित

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

पालघर जिल्ह्यात वादळी पावसामुळे स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा व गावातील राहत्या घरमालकांच्या घरांचे नुकसान होऊन तीन महिने होऊन देखील शासनाकडून कुठलेच मदत कार्य न मिळाल्यामुळे सफाळे पश्चिमेकडील गावातील नागरिकांकडून शासनाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

4 जून 2025 रोजी पालघर जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस झाल्यामुळे सफाळे -पश्चिम भागातील वेढी, खार्डी, दातेवरे,भादवे अशा समुद्रकिनारी वास्तव्य करून राहत असलेल्या गावातील राहत्या घरमालकांच्या घराचे व गावातील स्मशानभूमीसह जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडून जाऊन या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

याबाबत तातडीने पंचनामे करून नुकसान झालेल्या घरमालकांना नुकसान भरपाई देण्यात यावी व खार्डी येथील जिल्हा परिषद शाळा व स्मशानभूमीची डाग-डुजी करण्यात यावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पालघर तालुकाप्रमुख नचिकेत पाटील यांनी केली होती.
या मागणीवरून पालघर जिल्हा परिषदे कडून या गावांची पाहणी करून पंचनामे करण्यात आले होते.

या घटनेला तीन महिने होऊन देखील शासनाकडून या नुकसानग्रस्त घरमालकांना कुठलेच मदत आज तगायत नमिळाल्यामुळे या भागातील नागरिकांकडून शासनाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button