पालघर जिल्ह्यातील सफाळे टेंभीखोडावे गाव विकास कामांच्या प्रगती पथावर…

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
सफाळे पश्चिमेकडी टेंभीखोडावे गाव सध्या विकास कामांच्या प्रगतीपथावर आहे. 5000 हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील ग्रामस्थांनी या ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक करून देऊन एक सरपंच, एक उपसरपंच आणि आठ सदस्य अशा सुशिक्षित 10 लोकांची गावाच्या विकासासाठी निवड करून दिली आहे.ही नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून 2025-26 या वर्षात अनेक नवीन विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
शासनाच्या अनेक योजनांचा व कल्याणकारी सुविधांचा लाभ घेऊन गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या गावच्या विद्यमान सरपंच सौ. शोभा पाटील आणि उपसरपंच धनेश गावड यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी कंबर खचली आहे.
सध्या या गावाच्या हद्दीत एल अँड टी कंपनी मार्फत मुंबई आमदाबाद जलद गती बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून या गावच्या सरपंच आणि उपसरपंच यांनी एल अँड टी सी एस आर दहा लाख रुपयांचा फंड मिळवून टेंभीखोडावे भाटीचापाडा गावात अंगणवाडी उभारणीचे काम सुरू केले आहे. तसेच डोंगरी विकास योजनेच्या दहा लाख रुपयांच्या फंडातून टेंभीखाडावे भाटीचापाडा मुख्य रस्ता ते हिराजी भोईर यांच्या घरापर्यंत नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करून जन सुविधा योजनेतून नऊ लाख 90 हजार रुपये किमतीची नवीन स्मशानभूमी टेंभीखोडावे स्टॉप जवळ उभारण्याचे काम चालू आहे
तसेच या ग्रामपंचायतीमार्फत या गावात दोन लाख 42 हजार रुपयांचे कचरा विलंगीकरण नवीन सेड उभारण्याचे काम देखील चालू असून जन सुविधा योजनेतून ग्रामपंचायत मार्फत दोन लाख 50 हजार रुपये किमतीचे नवीन शौचालयाचे देखील बांधण्याचे काम चालू आहे.
तसेच या भागातील केर कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करून टेंभीखोडावे ग्रामपंचायती मार्फत या भागातील शेतकऱ्यांना विनामूल्य पुरवले जाईल तसेच या भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार आणि एल अँड टी कंपनी व पालघर जिल्हा परिषदेच्या मदतीने सुसज्ज सुविधा उपलब्ध असलेली इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा देखील यावर्षी चालू करण्यात येईल अशी माहिती या ग्रामपंचायतीचे बिनविरोधपणे निवडून आलेले उपसरपंच धनेश गावड यांनी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्कला दिली आहे.



