अकलूज येथील प्रतापसिंह चौकात अपघात –ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने पोपट एकतपुरे या इसमाचा मृत्यू

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .——- 97 30 867 448
अकलूज येथील प्रताप सिंह चौकात ट्रक खाली सापडून एकाचा मृत्यू झाला असून या घटनेची नोंद अकलूज पोलीस स्टेशनला झाली आहे याबाबत मयत पोपट दाजी एकतपुरे यांचा भाऊ रामचंद्र दाजी एकतपुरे यांनी अकलूज पोलीस स्टेशनला समक्ष उपस्थित राहून फिर्याद दिली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की मी रामचंद्र दाजी एकतपुरे वय ४२ वर्ष व्यवसाय सेन्ट्रींग रा. शिवतेजनगर, | देशमुखमळा, यशवंतनगर ता. माळशिरस जि. सोलापूर समक्ष पोलीस ठाणेस हजर राहुन जबाब देतो की,मोबाईल नंबर (७२४९००२९५४ )वरील ठिकाणी मी, आई शांतबाई असे राहणेस असुन सेन्ट्रींगचे काम करुन कुटुंबाचा ‘ उपजिविका भागवतो. माझे घरा शेजारी माझा थोरला भाऊ पोपट दाजी एकतपुरे हा त्याचे कुटुंबासह राहणेस आहे. आज दिनांक २५/०३/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. चे सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी मी जुने एस टी स्टॅंड येथे आलो होतो.
तेथे भाजीपाला घेऊन परत ११.४५ वा. चे सुमारास घरी गेलो तेवढयात आमचे शेजारी राहणेस असलेले रणजीत बाळु एकतपुरे हा माझेकडे आला व त्याने मला, तुमच्या भावाला प्रतापसिंह चौकात ट्रकने धडक दिली आहे असे सांगितल्याने दत्तात्रय पांडुरंग एकतपुरे यांचे मोटार सायकलवर मी प्रतापसिंह चौकात आलो तेव्हा तेथे लोक जमलेले होते. जवळ जाऊन पाहिले तेव्हा माझा भाऊ पोपट याची ‘ सायकल पडलेली दिसली व बाजुस ट्रक उभा होता. ट्रकचा नंबर पाहिला असता एम. एच. १६/सीसी ६०४८ असा होता.
सदर ट्रकचे चाक माझा भाऊ पोपट याचे डोकीवरुन गेल्यामुळे तो मयत झाला असल्याचे दिसले. त्यावेळी प्रत्यक्ष घटना पाहणारा आमचे येथे राहणारा बापू . एकतपुरे याने सांगितले की, माझा भाऊ पोपट हा सायकलवरुन जात असताना पाठीमागुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने सदरचा अपघात झाला असल्याचे सांगितले. . त्यानंतर आम्ही सदर ट्रकचे चालकाबाबत माहिती घेतली असता त्याचे नांव अनिकेत अंकूश कवडे रा. कोळवडी ता. कर्जत जि. अहमदनगर असे असल्याचे समजले.
सदर वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने व निष्काळजीपणे तसेच बेदरकारपणे वेगामध्ये चालवून माझा भाऊ पोपट दाजी एकतपुरे वय ५५ वर्षे रा. शिवतेजनगर, देशमुखमळा, यशवंतनगर ता. माळशिरस हा सायकलवरुन जात । असताना त्यास पाठीमागुन जोराची धडक देवून त्याचे मरणास कारणीभुत झाला आहे व अपंघात झाल्यानंतर तेथे न थांबता निघून गेला आहे म्हणून माझी त्याचेविरुध्द तकार आहे.
माझा वरील संगणकावर टंकलिखीत केलेला जबाब मी वाचुन पाहिला तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे.
या अपघाताची अकलूज पोलीस स्टेशन मध्ये नोंदझाली असुन दि.२५/७/२३ रोजी दुपारी १/०२ मि दाखल झाला आहे .. गुन्हा रजिस्टर नंबर ५२८/२३ पोलिस नाईक डुबल ./६६२ यांनी फिर्याद दाखल करुन घेतली असुन तपास हेड कॉन्स्टेबल /५३६ हे करत आहेत.



