जव्हार वनविभागाच्या वनरक्षकाला 30000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा
प्रतिनिधी विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
पालघर जिल्ह्यातील जव्हार वनविभागाच्या रस्त्याचा वापर करून ट्रॅक्टर मधून अवैधरित्या वाळू वाहतूक नियमित चालू ठेवण्यासाठी व ट्रॅक्टर वर कायदेशीर गुन्हा दाखल न करण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी जव्हार वनखात्याच्या वनरक्षकाला सोमवारी दुपारी सापळा रचून अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने रंगेहात अटक करून त्यांच्याविरुद्ध मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार वनविभागाच्या रस्त्यातून तक्रारदार हे ट्रॅक्टर मधून अवैधरित्या वाळूची वाहतूक करत होते. ही वाहतूक नियमित चालू ठेवण्यासाठी व ट्रॅक्टर वर कुठलाही गुन्हा किंवा कायदेशीर कारवाई न करण्यासाठी जव्हार वनविभागाचे वनरक्षक भूषण आनंदा शेवरे वय वर्ष (34)यांनी 21 डिसेंबर 2023 रोजी या ट्रॅक्टर वाल्याकडे 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत या वनरक्षकाची लेखी तक्रार या ट्रॅक्टर वाल्याने अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची पडताळणी करून सोमवार दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी दुपारी 13.55 वाजता सापळा रचून पंचा समक्ष वनरक्षक भूषण शेवरे यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्यांच्याविरुद्ध मोखाडा पोलिस ठाण्यात गुन्हा केला आहे. या बाबत पुढील तपास मोखाडा पोलीस करीत आहेत.



