महाराष्ट्र

सुरतार संगीत विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सुरसुधा संगीत महोत्सव विविध गीताच्या व शास्त्रीय नृत्य सादरीकरणाने मोठ्या उत्साहात संपन्न मुंबईसह परराज्यातील कलाकारांनी विविध नृत्य करून रसिकांची मने जिंकली

करमाळा प्रतिनिधी

आलिम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

सूरताल संगीत विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेला सूरसुधा संगीत महोत्सव विविध गीतांच्या आणि बहारदार शास्त्रीय नृत्य सादरीकरणाने संपन्न झाला. यावेळी कोलकत्ता, गुवाहाटी, मध्यप्रदेश, तेलंगना, आसाम, मुंबई येथील कलाकारांनी कथक, सत्रीय, भरत नाट्यम, कुचीपुडी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली.

सुरताल संगीत विद्यालय तालुका करमाळा च्या वतीने सुर सुधा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार संजय मामा शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सहसंचालक दत्तात्रेय देवळे, डॉ अँड बाबुराव हिरडे आदी उपस्थित होते.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सुर ताल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर केली. सूरताल संगीत विद्यालयाच्या वतीने आणि यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने यावेळी विविध पुरस्कार देण्यात आले. डॉक्टर कविता कांबळे यांना संगीत रसिक तसेच करमाळा पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांना बा सं नरारे महाराज जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर कलाकारामध्ये सरबानी सेन कोलकता व चित्रलेखा गोगोई गुवाहाटी करमाळा नृत्यभूषण अवार्ड, डॉक्टर विधी नागर इंदोर व डॉक्टर मयुरा आनंद खटावकर यांना करमाळा नृत्यभूषण अवॉर्ड, स्नेहा रामचंद्र हैदराबाद व अर्पिता व्यंकटेश कोलकता यांना नृत्य शिरोमणी अवार्ड, काकली हजारिका गुवाहाटी व वनिता भांजा, भूबनेश्वर यांना नृत्य सम्राज्ञी अवार्ड तर दीपिका बोरो गुवाहाटी यांना करमाळा नृत्य कला अवार्ड देऊन गौरविण्यात आले.

यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना सुर सुधा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त करमाळा तालुक्यातील पत्रकारांचा सुरताल विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राग भैरवी गाऊन करण्यात आला. यावेळी प्रा मिलींद फंड, संतोष पोतदार, लक्ष्मण लष्कर, दिगंबर पवार, डॉ महेश वीर, महादेव फंड, सुहास कांबळे, सारंग ढवळे, अशोक बरडे, गणेश आरडे, किरण नरारे, किशोरकुमार नरारे,शंभू आलापुरे, निलेश कुलकर्णी, निशांत खारगे, रोहीत ढवळे, बाळासाहेब महाराज आदी मान्यवर व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नरारे सुत्रसंचलन प्रा. विष्णु शिंदे आभार संतोष पोतदार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button