मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड ,जिजाऊ ब्रिगेड, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद व समविचारी सामाजिक व राजकीय संघटनांचा मार्गदर्शन मेळावा करमाळा येथे संपन्न

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सामाजिक व राजकीय संघटनांचा जाहीर मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम जी खेडेकर साहेब आले होते .यावेळी खेडेकर साहेब यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी बोलताना सांगितले की समाजामध्ये आता जागरूक होण्याची वेळ आली आहे .त्यामुळे आता सर्व तरुण युवक युवतींनी जागरूक होऊन समाजाची दिशा बदलले गरजेचे आहे. आजही समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते याचे सुद्धा गंभीर चिंतन करावे लागेल असेही सांगितले .
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे समतेचे व न्यायाचे होते यावरही त्यांनी भाष्य केले छत्रपती शिवरायांनी केलेल्या लढाया या जातीवर किंवा कोणत्या धर्माच्या विरोधात केल्या नव्हत्या तर त्या लढाया अन्याय व जुलूम यांच्या विरोधात होत्या हे सुद्धा त्यांनी बोलताना सांगितले .

पुढे बोलताना खेडेकर साहेब यांनी शिव, फुले ,शाहू आंबेडकर ,यांच्या विचारधारेवरच समाजाने चालले तर भविष्यामध्ये भले होईल .यासाठी मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता पुढे आलं पाहिजे. असेही खेडेकर यांनी सांगितले व करमाळा तालुक्यामध्ये समविचारी संघटनांनी राबवलेला उपक्रम हा अतिशय चांगला आहे यासाठी मराठा सेवा संघाने कायमस्वरूपी पुढाकार घ्यावा हे सुद्धा त्यांनी सुचित केले .अशाच रीतीने सर्व राजकीय सामाजिक व गटातटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम केले तर मात्र नक्कीच शिवरायांचे समतेचे राज्य आल्याशिवाय राहणार नाही असेही स्पष्ट मत यावेळी खेडेकर साहेब यांनी मांडले . यावेळी माजी आमदार रेखाताई खेडेकर ,मराठा सेवा संघ प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुनराव तनपुरेसर ,पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने, पुणे विभाग संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरण घाडगे यांनीही मनोगत व्यक्त केले .
यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व कट्टर विरोधी राजकीय गटातटातील व पक्षातील, शिक्षण क्षेत्रातील सर्व पदाधिकारी एकत्र आले विद्यमान जि प सदस्य व माजी सदस्य ,पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व माजी सदस्य माजी सभापती, करमाळा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक , मार्केट कमिटीचे सभापती व संचालक विविध गावचे आजी माझी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य करमाळा तालुक्यातील सहकारी कारखान्याचे संचालक व माजी संचालक अशी नामवंत मंडळी या कार्यक्रमाला आपले राजकीय जोडे बाहेरच सोडून एकत्र आली व आदरणीय खेडेकर साहेब यांचे मार्गदर्शन ऐकले याबद्दल मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष सचिन काळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन खटके गणेश कुकडे सतीश वीर अजित कणसे यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला .




