फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांना यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
सोशल मीडियाद्वारे ओळख करून एका (17) वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला पालघर जिल्ह्यातील केळवा बीच येथील झाडी झुडपात नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून पळून गेलेल्या आरोपीला सागरी केळवा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून बोईसर नागझरी येथून अटक करून जेरबंद केले आहे.

अल्पवयीन (17) वर्षीय मुलगी ही पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील रहिवासी आहे. तर आरोपी तिचा प्रियकर अनिल दिलीप ठाकरे वय वर्ष (25) राहणार चिल्लार पाडा पालघर येथील रहिवासी आहे.
तो बोईसर येथील एका कंपनीत काम करतो.
या दोघांची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती.
या ओळखीचे काही महिन्यानंतर प्रेम संबंधात रूपांतर झाल्यावर आरोपी अनिल हा या अल्पवयीन मुलीला पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील झाडी झुडपात घेऊन जाऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता. यानंतर ही मुलगी सहा महिन्याची गरोदर राहिल्यावर या मुलींनी व तिच्या कुटुंबीयांनी केळवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, आणि पोलीस कॉन्स्टेबल सरिकर आणि हेड कॉन्स्टेबल कांबडी या आरोपीचा शोध घेत असताना हा आरोपी बोईसर नागझरी रस्त्यावर दिसून आल्यावर पोलिसांना तो बघून पळून जात असताना केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी त्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्याला अटक करून जेरबंद केले आहे.
या आरोपीविरुद्ध शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी केळवा सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी करीत आहेत.



