महाराष्ट्र
गिरवी येथील मोहन डिसले यांच्या ऊसाला विज वितरणचा विजेचा गोळा पडल्याने आग

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल 8378076123
गिरवी ( ता. इंदापूर ) येथील मोहन गेनबा डिसले यांचा एक एकर ऊसाला आग लागल्याने जळाला आहे. विज वितरण कंपनीच्या लाईनच्या तारेतून आगीचा गोळा ऊसात पडल्याने क्षणाचीही उसंत न देता ऊसाला आग लागून झाल्याची माहिती लग्न डिसले यांनी दिली.

आगीला वेळीच आळा घातला नसता तर आजूबाजूचा ऊसही जळाला असता. दरम्यान महसूल व विज वितरण कंपनीच्या वतीने सोमवारी पंचनामा करण्यात येणार आहे.



