NEET आणि JEE वर्गांच्या परीक्षेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांच्यावतीने पुर्वपरीक्षेचे आयोजन

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत शासकिय व अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता 10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल व इंजनिअरींग साठीच्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी- NEET आणि JEE वर्गांच्या प्रवेशासाठी पुर्वपरीक्षेचे आयोजन करण्यात आले असुन यासाठी शासकिय व अनुदानित आश्रमशाळेमधुन 480 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी 428 विद्यार्थ्यांनी चार परीक्षाकेंद्रावर परीक्षा दिली. या परीक्षेमधुन डहाणू व जव्हार प्रकल्पामधुन JEE साठी 50 विद्यार्थी व NEET साठी 50 विद्यार्थ्यांची गुणानूक्रमे निवड केली जाणार आहे.
यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षासाठी JEE साठी प्रवेशित असलेल्या खुटल शासकीय आश्रम शाळेतील गुणवत्ता प्राप्त असलेल्या मुलांचे नामांकित शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रक्रिया सध्या सुरु आहेत.
या अनुषंगाने प्रकल्प अधिकारी श्रीमती संजिता महापात्रा यांनी परीक्षा केंद्राना भेटी दिल्या व विद्यार्थ्यांनी बारावीनंतर निर्माण होणाऱ्या मेडिकल व इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे भविष्य घडवण्याच्या अनुषंगाने किती फायदा होणार आहे व खाजगी क्लासेसच्या शिवाय आश्रमशाळेतच मुलांना या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी तज्ञ संस्थेमार्फत इयत्ता 11 व 12 सोबतच दोन वर्ष मार्गदर्शन मिळणार असल्याने या उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले.
या प्रवेश पूर्व परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी,कर्मचारी,आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, गृहपाल यांनी मुलाचे सहकार्य केले.



