महाराष्ट्र
पोलीस मित्र परिवार समन्वय समिती नाशिक शहर आणि ज्ञात अमृत बहुउद्देशीय आदिवासी संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजूंना जीवनावश्यक साहित्य व वस्तूंचे वाटप

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
पोलीस मित्रपरिवार समन्वय समिती नाशिक शहर ज्ञात अमृत बहुउद्देशीय आदिवासी संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक जिल्ह्यातील मेटघर येथील गरजूंना रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी जीवनावश्यक वस्तू कपडे व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले

या कार्यक्रमाचे आयोजक व नियोजक कैलास सूर्यवंशी व परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाला शहर कार्य कारणी पदाधिकारी सुनील परदेशी, राहुल जोरे,वीरेंद्र सिंग टिळे, राजेंद्र आहेर, कैलास सूर्यवंशी, योगेश पाटील, सुभाष कापडी,रूपाली तांबारे, तेजल शिंदे,मनीषा खंडीझोड, सूर्यवंशी सर,ॲडव्होकेट महाले, व ग्रामस्थांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




