सफाळे शिलटे पाडा येथे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

पालघर जिल्हा
प्रतिनिधी विजय घरत
मो नंबर 7030516640
सफाळे भागातील होतकरू महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड केंद्रीय कृषी मंत्रालय द्वारा प्रमाणित कौशल्य विकास आणि रोजगार केंद्र यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सफाळे शिलटे पाडा येथे

पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अजंता ॲग्रो मल्टीस्टेटचे चेअरमन अजित घोसाळकर, व्हाईस चेअरमन सौ.रुपाली ठाकूर गावित, संचालक सुभाष चौधरी, पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे,

आणि पालघर डहाणू महिला बचत गट अध्यक्ष सुनेत्रा राऊत,मांडे सरपंच महेंद्र पाटील, टेंभीखोडावे उपसरपंच धनेश गावड, जलसार सरपंच सौ. साक्षी गावाड, माकणे सरपंच प्रमोद शेलार आणि भागातील ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




