मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत प्रक्रिया पूर्णपणे निःशुल्क – गणेश चव्हाण

करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना मोठी मदत मिळत आहे. यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचत आहेत, वैद्यकीय मदत मिळविण्याची प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे गरजू रुग्णाला पूर्वी सारखे मंत्रालयात जाण्याची आवशकता नाही. ऑनलाईन अर्ज करुन ही मदत मिळविता येणार आहे. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळविण्यासाठी कोणालाही एक रुपयाही द्यायची आवशकता नाही, पूर्ण प्रक्रिया मोफत आहे. अशी माहिती वैद्यकीय सहाय्यक गणेश चव्हाण यांनी दिली. तसेच पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, या योजनेमध्ये रुग्णालयांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जात आहे. मात्र रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे आल्या आहेत.

त्यांनी यावर अनेकवेळा कडक कारवाई देखील केली. जर असा कोणी दुवा आपल्याला पैशांची मागणी करत असेल तर त्याची माहिती तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधी, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई या ठिकाणी किंवा आमच्याशी संपर्क साधून करा, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कक्षप्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या माध्यमातून या कक्षाने १५६ कोटींच्या जवळपास मदत केली आहे. यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. येत्या काळात हा कक्ष अधिक क्षमतेने चालवू असे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.



