“नमो चषक” भव्य क्रीडा,सांस्कृतिक महोत्सवाचे करमाळ्यात आयोजन,जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे :काकासाहेब सरडे
करमाळा प्रतिनिधी
अलिम शेख
मो नंबर 9850686360
करमाळा :- भारतीय जनता पार्टी आयोजित “नमो चषक” चे भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे करमाळ्यात आयोजन करण्यात येणार असलेचे भारतीय जनता पार्टीचे ता.सरचिटणीस तथा करंजे गावचे विद्यमान सरपंच काकासाहेब सरडे यांनी सांगितले आहे.श्री सरडे हे या “नमो चषक” स्पर्धेचे करमाळा विधानसभा समन्व्यक आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात “नमो चषक” भव्य क्रीडा व सांस्कृतिक मोहोत्सवाचे आयोजन केलेले आहे. यानुसार करमाळा तालुक्यात विविध खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
यामध्ये कुस्ती,फुटबॉल,खो-खो, हॉलिबॉल,क्रिकेट,रस्सीखेच,कॅरम,
बुद्धिबळ,कब्बडी,आथलॅटिक्स, कुस्ती आदी मैदानी खेळांचा समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय चित्रकला,रांगोळी,गीत गायन, नृत्य स्पर्धा, एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा यांचाही समावेश असणार आहे. या स्पर्धेसाठी २५ डिसेंबर ते १० जानेवारी नावनोंदणी करण्यात येणार आहे.१२ जानेवारी ते २६ जानेवारी च्या दरम्यान या स्पर्धा माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,
भाजपचे करमाळा विधानसभा प्रमुख गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत.
तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन नावनोंदणी करावी व नावनोंदणी साठी भाजपा कार्यालय,गायकवाड चौक करमाळा या ठिकाणी संपर्क साधावा असे अवाहन श्री सरडे यांनी केले आहे.