शितलदेवी मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धाचे बक्षिस वितरण संपन्न

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
अकलूज येथील जि.प.प्राथमिक शाळा राऊत नगर ( दत्तनगर ) येथे.सोलापूर जिल्हा .परिषदेच्या माजी सदस्या व ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या अध्यक्ष. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मराठी शाळेत पाढे पाठांतर स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व या स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांना प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व.तृतीय क्रमांक असे १ ली ते सातवी पर्यंतच्या सर्व मुलांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई मुलाणी व .राजाभाऊ माने यांच्या हस्ते करण्यात आले.

अतिशय उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होवून शितलदेवी मोहिते पाटील यांना .(वहिनीसाहेबांना) मुलांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या सर्व मुलांचे देखील शितलदेवी मोहिते पाटील याँनी (.वहिनीसाहेबानी) कौतुक करत इतका सुंदर कार्यक्रम राबविला बद्दल आभार व्यक्त केले व अभ्यास करून शाळेचे व आपल्या आई वडील व गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन फोनवरून केले.वहिनीसाहेबांचा फोन मुलांना येताच मुलांचा आनंद द्विगुणित झाला.हा अतिशय सुंदर कार्यक्रम जि.प.शाळेच्या मुख्याधिपिका गुंड मैडम.काझी मैडम..कदम मैडम. .धोत्रे मैडम व .जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असा संपन्न झाला




