शहर
सोलापूर जिल्हा परिषद आदर्श शाळा माळेवाडी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षपदी अस्लम भाई पटेल यांची निवड

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज : सोलापूर जिल्हा परिषद आदर्श शाळा माळेवाडी अकलूज शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी अस्लम भाई पटेल यांची निवड झाल्याबद्दल भाजपा अल्पसंख्यांक मोर्चे व अकलूज मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चे तालुका उपाध्यक्ष जमीर भाई चौधरी, अकलूज भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा अकलूज शहराध्यक्ष अस्लम बाबा सय्यद मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ नेते रफिक चाचा पठाण,मौला भाई शेख,मुस्लिम समाजाचे राष्ट्रीय खेळाडू अस्लम भाई मुजावर शहराध्यक्ष हमीद भाई मुलाणी ,अतिक शेख,आलम शेख,परवेज शेख, मा.अकबर शेख,टाईम्स 9 मराठी न्युज चॅनलचे संपादक नौशाद भाई मुलाणी,माळीनगर पत्रकार रियाज भाई मुलाणी, महेंद्र साठे( सर ), सुधाकर ( नाना ) बनसोडे आदि उपस्थित होते.




