शैक्षणिक

५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सोहळ्यात युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल, जव्हार शाळेने पटकावला प्रथम क्रमांक

(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर (मो.९०२८३०५३१९ )

टाईम्स ९ मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने शिक्षण विभाग पंचायत समिती जव्हार अंर्तगत ५१वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२३-२४ दि.१४ व १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन जि.प अध्यक्ष माननीय प्रकाशजी निकम साहेब, पंचायत समितीच्या सभापती विजयाताई लहारे मॅडम ,गटशिक्षाणाधिकारी पुंडलिक चौधरी साहेब यांच्या हस्ते झाले.

शिक्षक व विद्यार्थी यांची विज्ञानाप्रती असलेली आवड ही वेगवेगळ्या पद्धतीने निरीक्षण करून त्यांचे निष्कर्ष दाखवून प्रयोगाची मांडणी करण्यात आली. त्याचे परीक्षकांनीही विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगाचे निरीक्षण व निष्कर्ष पडताळून विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. यामध्ये जव्हार मधील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल ,भारती विद्यापीठ, ज्ञानगंगा व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

त्यात युनिव्हर्सल शाळेच्या विद्यार्थ्यांनी कुमारी अल्विया मुल्ला व कुमारी भावना पाटील यांनी तयार केलेल्या *आपले सण आपले आरोग्य* या विज्ञान प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला.त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे व आलेल्या प्रथम क्रमांकामुळे या विद्यार्थिनींना आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यात दिसले. त्यांच्या पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शाळेचे अध्यक्ष मा. इर्शाद मुल्ला, सचिव मा. हर्षद मेघपुरिया, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका पायल मेघपुरिया व मार्गदर्शक राजेंद्र भोईर व इतर शिक्षक वृंद यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button